ओरिसाच्या कोणार्क
मंदिरात सुर्याचे अप्रतिम शिल्प आहेत, म्हणे. सकाळचा सुर्य, दुपारचा सुर्य आणि
सायंकाळचा सुर्य असताना सुर्यदेवतेच्या चेहऱ्यावर कसे भाव दिसतात, हे कल्पकतेने
रेखाटले आहे. सांगायचा असा विषय आहे, की रोजच्या घडामोंडीना जर मानवी चेहरा असेल
तर तो कसा चेहरा असेल? याचा विचार केला तर नक्कीच धक्कादायक निष्कर्ष
हाती येतात.
सेलिब्रिटींचा चेहरा
घातलेल्या या घडामोंडींना
शेतकऱ्यांच्या समस्या असो की नागरी समस्यांच्या वेदना
आहेत. त्यातही गुन्हेगारींच्या विळख्यातून कितीदा चाकूने भोसकले जाते किंवा
अत्याचार केले जातात याला सीमा नाही. तरीही इस्त्राईलचे
पंतप्रधानांची भेट असो की आणखी काही सतत उत्सवांचा भडिमार यातून सुंदर पोषाख
चढविले जातात. तरीही जातीभेद असो की गरीबी-श्रीमंतीची रोग झाकले जात नाहीत. कुठे
तरी अशा बिनचेहऱ्याच्या दिवसाबरोबर प्रवास सुरू असतो. तेव्हा आपण नक्कीच कुठे
नक्की जात असतो.
मुळात राजकीय पक्ष
असो की नेते यांचा नेहमीच एक अजेंडा आहे. फुटकळ अथवा प्रसिध्दीचा हव्यास धरून
विधाने करून राळ उडवायची. याने काय होते, तरी मुख्य समस्या बाजूला राहतात, अन्
भलत्याच विषयांचीत चर्चा होते. उदा. राज्य मनुष्यबळ मंत्री उर्फ ब्रेनवाश खात्याचे
सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देणारे भाष्य केले. दहशतवाद या
विषयावर सखोल अभ्यास करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याने काय साध्य केले.
अभ्यासक्रमात वैज्ञानिक विचारसरणीचा पाया उद्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र
अशा विधानामुळे सर्वसामान्यांना चांगल्या शिक्षणाची भीक नको, पण कुत्रे आवर
म्हणायची वेळ आली आहे.
To be
continued
Shrikant Pawar