कोरोना मार्चपासून हाहाकार करत असताना मला काही हॉलिवूडमधील सिनेमांची आठवण येत आहे. रोगराई पसरणे हे काही औषधे कंपन्या तसेच काही जागतिक नेत्यांसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते.
आपण पाहिलंच आहे की कोरोनाच्या काळात चीनने स्वतःची आर्थिक भरभराट निर्यात करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच कोरोना हा मानवनिर्मित आहे की नैसर्गिक यावर प्रश्नचिन्ह तयार होत आहे. चीनचे आजपर्यंत व्यवहार ही तसेच संशयास्पद झाले आहेत. मग नव्या कोरोनाचे बिल कुणाच्या खात्यावर फाडण्यात येणार आहे?
कोरोनाची लस बाजारात आणण्यासाठी अनेक औषधे कंपन्यांची धडपड सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग आपोआप आटोक्यात आल्यास या कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे भांडवल वाया जाणार नाही का? माणसांमधली भीती हीच बाजारपेठ मिळविण्याची सर्वात मोठी शक्ती असते. कोरोनाची भीती जगामधून जाणे हे औषधी कंपन्यांना परवडणारे नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपन्यांच्या लसी विविध सरकारकडून खरेदी होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या भीतीचे मार्केट जोरदार चालणार आहे.
याचा
असा अर्थ नाही की कोरोनाचा नवा प्रकार खोटा आहे? किंवा करोना प्राणघातक नाही. पण, त्यावर इलाज करण्याबरोबरच भीती निर्माण करण्याचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न होत आहेत. दुष्काळ हा कुणालाच नको, हे खरे आहे का? पाण्याची टँकर लॉबी असो की विविध अनुदान लागणारे लोक त्यांच्यासाठी दुष्काळ एक वरदान असते. तसेच कोरोनाचे संकट हे काही कंपन्या उद्योग तसेच सरकारसाठीही फायदेशीर असते.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे...