बीबीसी कोण आहे?
बीबीसी ही ब्रिटनच्या सरकारच्या मालकीचा मिडीया आहे.ही जगभरातील देशामध्ये वार्ताहर नेमून वार्तांकन करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अर्थातच ब्रिटनचा मिडीया भारताच्या हिताच्या किंवा भारताला बळकट करेल अशी पत्रकारीता करेल ही अपेक्षा करणेच बालीशपणा आहे. बीबीसी आता पुर्वीसारखी प्रामाणिक राहिली नाही ही गोष्ट खरी आहे.पण अलीकडच्या काळात बीबीसीमध्ये पत्रकारितापेक्षा
देशाची हेरगिरी करणे व देशामध्ये अस्वस्थता निर्माण होईल अशा पध्दतीने जाणूनबूजुन काम केले जात आहे.
जागतीक मिडीयाची व्युहनीती काय आहे?
भारताची परकीय गंगाजळी अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. स्थिर सरकार व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसलेल्या गुजराती व्यापा-यासारखे भारताचा
उद्योग मेक इन इंडिया सारखे महत्वांकाक्षी करत आहे. त्यामुळे जागतीक पातळीवरील पाश्चामात्य मिडीया भारताला नेहमी अपमानीत करता येईल अशाच खुराकाच्या शोधात असतो. भारतावर बलात्का-यांचा
देश (रेपीस्ट कंट्री) असा शिक्का बसला तर भारताकडे वळणारी परकीय गुंतवणुक कमी होईल असा त्यांना विश्वास आहे. तसेच भारताची बाजारपेठ वाढणारे सामर्थ्य याला अटकाव करण्यासाठी मीडीयाचा सतत वापर केला जातोय.चीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यामुळे चीनने त्यांच्या देशात परकीय मिडियाच्या वार्ताहरावर अत्यंत कडक नियम घातले आहेत. चीनमध्ये गुगलला सुध्दा बंदी आहे.त्यातून युट्युब , फेसबुकसारखासोशल मिडीया हा चीनच्या बाबतीत खोडसाळपणा करू शकत नाही.
निर्भया व्हिडिओने काय दाखविले ?
दिल्लीतील बलात्कार करणा-या विकृत गुन्हेगाराची मुलाखत घेतली.क्रुरपणे गुन्ह्याची शिक्षा भोगणारा तो गुन्हेगार समाजाला -आपल्याला ठासून सांगतोय की तीने विरोध केला नसता तर तीला मारले
नसते. त्याची बायको ही आपला पती निष्पाप असल्याचा दावा करत आहे.पत्रकारिताचा उद्देश्य
जनसामान्यापर्यंत माहिती पोहोचविणे , प्रबोधन करणे व मत बनविणे, जागरूक
करणे हा आहे. बीबीसीने व्हिडिओमध्ये केवळ सर्वसामान्यांना शासनाबद्दल राग निर्माण करून जुन्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे निर्भयाच्या मुलीचे व पालकाचे नाव जाहीर
करून नैतीकतेला हरताळ फासला आहे. दिल्ली हायकोर्ट व केंद्र सरकारने यावर का बंदी घातली याचा कसलाही विचार न करता बीबीसीने ब्रिटनमध्ये प्रसिध्द करून भारतीयांचा अपमान केला आहे.
व्हिडिओमध्ये असे चित्र रंगविले आहे की भारत देश हा बलात्का-यांचा आहे व येथील सर्व पुरूष बलात्कारीच आहेत. भारतात ब्रिटनसारखा कारभार विनाघटना चालत नाही. द टेलीग्राफ ब्रिटनमधील
विश्वासू दैनीकाच्या आकडेवारीनुसार सन २०१३ साली २२ हजार बलात्कार केसेस दाखल झाल्या आहेत.
भारतात याच वर्षी २४ हजार केसेस दाखल झाल्या आहेत. लोकसंख्येची तुलना केली असता भारतापेक्षा ब्रिटनमध्ये बलात्कारांची संख्या अधिक आहे.
निर्भया केसपासून आपण काय शिकलो?
निर्भया बलाकाराच्या घटनेपासून मिडिया, राजकीय व्यक्ती, प्रशासन, पोलिस, न्याययंत्रणा, सर्वसामान्य माणुस एकदंरीत समाज काय शिकला आहे? बलात्काराच्या घटना आजही होत आहेत. पण गुन्हेगारांना शिक्षेचे भय नाही. कायद्याची पळवाट काढत जाणा-यांना अटकाव करणारी पोलादी व गतीमान न्याययंत्रणा नाही.देशातील समाज, नागरीक अस्वस्थ झाले तर त्यांना किमान हाताळायचे तरी कसे याचे राजकीय व्यक्ती, प्रशासन यांना अजूनही भान आले नाही. नुकताच पिंपरी चिंचवड शहरात पोलिसयंत्रणेने बलात्काराची केस
गांभीर्याने घेतली नसल्यामुळे बलात्कार झालेल्या मुलीने आत्महत्या केली आहे.मिडीयाला अजूनही लोकांच्या प्रक्षोभाचे रूपांतर सकारात्मक शक्तीत करता येत नाही. उलट लोकांच्या प्रक्षोभाला
पाहून ते गांगारून जात बघ्याची भूमिका घेत आहेत. ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे.
नेमका उपाय का आहे?
परस्त्रीयाकडे कसे पहावे ? स्त्रीयांना सन्मानाची वागणुक देणे या गोष्टी प्रत्येकाला माहित करून देण्याची वेळ आली आहे. स्त्रीम्हणजे मातृत्वाची दैवी देणगी ! त्यामुळे बलात्कार करणारे
आपल्या जन्मस्थानाचाच धिक्कार करत आहेत. अनेक चित्रपट, जाहिरातीतुन स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य व एखादी वस्तू आहे असे सादरीकरण केले जाते यावरही बंधन हवे आहे. सेन्सॉर तर केवळ नावालाच आहे.
बलात्कार घटनेसाठी न्यायतातडीने देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट व गुन्हेगार व्यक्तीचे पुरूषत्व नष्ट करणे अशा कठोर शिक्षेचा उपाय करणे.देशभरात अश्लील सीडीज, वेबसाईटज, व्हीडिओजवर बंदी घालणे.
नियम मोडणा-या व्यक्तीला कठोर शिक्षा व प्रचंड आर्थिक दंड असायला हवा.याउलट मातृसत्ताक पध्दतीचा स्त्रीत्वाचा आदर निर्माण करणारे संस्कार करणारी शिक्षणपध्दती हवी आहे.
युट्युब किंवा ब्लॉगर यावर शासनाने जागरूक नागरिकांचे स्वंयसेवक गट
निर्माण करायला हवेत. जे देशाबद्दल, समाजात वाईट गोष्टीचे उदात्तीकरण करेल त्याला त्वरीत उत्तर देईल. जागतीक पातळीवर भारताची बाजू मांडणारा व इतर देशातील सरकारची पोलखोल करणारा मिडिया असणे
आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment