सध्या भारतात 500, 1000 रूपयांच्या नोटांना काळ्या पैशामुळे भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे या निर्णायाची माहीती कुणालाच नव्हती. खुद्द पंतप्रधान यांनी देशाला संबोधीत केले तेव्हा काळा पैसा बाळगणार्यांना हार्ट अॅटक येण्याच शिल्लक राहील होत. या भाषणात प्रामाणिक नागरीकांना त्रास होणार नाही, मोदींच्या सर्जिकल सट्राइकमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळी घाण निघून जाईल. पाकिस्तान भारतात खोट्या नोटा पसरवून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करत होता. यामुळे चलन फुगवटा तुफान वाढत चालला होता. याला अटकाव कसा व कधी करायचा प्रश्र होता.
सुरुवातीला सरकारने गरीबांची मोफत बॅकेत खाती काढली. नंतर काळा पैसा बाळगणार्यांना अंतीम मुदत दिली. सगळे नियोजनबध्द असूनही कुणाला कानोकान खबर नव्हती.
आता कोट्यवधींची उलाढाल करून कर बुडविणारे व्यापारी, उद्योग यांना नाईलाजाने कर द्यावे लागेल. काळा पैसा ट्रस्ट,एनजीओ मधून बाहेर काढणे शक्य होईल. कारण नोटा बाद होण्याच्या भीतीने एकतर गुन्हा कबुल व्हावे लागेल. नाहीतर नोटा जाळून टाकाव्या लागतील.
ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ही बालकवीता अशा पध्दतीने
खरी होईल असे वाटले नव्हते. मोदी नमो नमः
No comments:
Post a Comment