निवडणुकीची शाळा भरली अन पार्टी फुटली... निवडणुकीची शाळा भरली अन पार्टी फुटली...
शाळेची वेळ झाली आहे.. सर्वांनी आपापली दप्तरे आणली आहेत का?
अस जर सगळ्याच निवडणुकीतील पक्षाच्या नेत्यांना बोलाविले तर काय होईल?
अहो , आधीच निवडणुकीची शाळा भरलीय ना.. त्यामुळे फुटणा-या पार्ट्यांचेच खळ खट्याक होतात ना...
कोणत्याही राजकारणाला विचाराचा आधार असतो ही समजुत तरी लोकशाहीच्या देशात आधुनिक अंधश्रध्दा म्हणावी अशीच आहे..
कोणत्याही इमारतीला पाया असतो, भले त्यावर मजले बांधली जातील अथवा नाही. पण कोणत्याही पक्षाचा पाया असल्याचे दिसत नाही. कधी कोणतीही भुमिका ३६० अंशात फिरवायची म्हणुन केलेली सोय असे मातब्बरांना वाटत असेल तर भ्रम आहे.
जशी कॉम्प्युटरची ऑपरेटींग सिस्टीम ही यंत्रणा हाताळते. तसेच पक्ष प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आपली लोकशाहीचा डोलारा सांभाळत आहेत. पण मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीमची सुधारीत आवृत्ती येते. त्याप्रमाणे राजकीय पक्ष काही सुधारणा करतात का? गोंधळलेली कॉग्रेस, धड सत्ताधारी नाही विरोधकही नाही अशा पध्दतीने काम करणारी शिवसेना, आपल्याच मनोविश्वात गुंग असणारा मनसे पक्ष, तर जेथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करणारा राष्ट्रवादी यामुळे राज्यातीले एका पक्षालाही अजुन लोकांना ठामपणे सत्ता मिळण्याची खात्री नाही. यामुळे कमी-अधीक प्रमाणात उरलीसुरले दबावगट, जातीसंघटनाही निवडणुकीच्या सौदेबाजीत हात मारून घेतात. यामुळे लोकशाहीची लक्तरे टांगली जातात त्याची जबाबदारी कोण घेणार?
मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मातब्बर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्यामुळे भाजप अवाजवी आत्मविश्वासात आहे.
आता राजकीय पक्षांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. ‘दुर्योधनाच्या बाजूला अनेक शकुनी मामा आहेत. भाजपची औकात काय, असे ते म्हणतात. २१ फेब्रुवारीला भाजपची काय औकात आहे, ते दाखवून देऊ,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले.
भाजपची औकात काय आहे, हे २१ फेब्रुवारीला समजेल. तुमची औकात काय आहे ?,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला
No comments:
Post a Comment