ज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने न केल्यास किती विपरीत घडू शकते याचे चांगले उदाहरण म्हणजे सनातन संस्था. या संघटनेचे मालक संमोहनतज्ज्ञ आहेत. संमोहनाचा वापर व्यक्तीमत्व विकासासाठी होऊ शकतो, हे जगजाहीर आहे. याचा वापर केल्यास माणूस प्रेरीत होऊन अवघडातील अवघड कामे आत्मविश्वासाने करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सनातनमध्ये संमोहनातून घातक रसायनाचा माणूस घडविण्याचे काम होत आल्याचे दिसून आले आहे. कसे होते हे काम? मुस्लिम दहशतवाद्यांचे जसे ब्रेनवाॕश केले जाते, तसेच ब्रेनवाॕश सनातनमध्ये केले जाते. कधी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे कोण ठरविणार? जर आपला मेंदू दुसरा नियंत्रित करणार असेल तर त्यासारखा दुर्बलपणा नाही. स्वामी विवेकानंद यांनी सामर्थ्य हेच जीवन तर दुर्बलता म्हणजे मृत्यू म्हटले होते. मग हिंदू जनजागृतीच्या नावाखाली सनातनला नेमके काय साध्य करायचे आहे? जर कोणी जहाल हिंदुत्ववादी याला समर्थन देत असेल तर त्याने पाकिस्तानकडे पहावे. धर्मांधता हा व्यवस्थेला नाशाकडे नेणारा आहे.
*बुद्धीची पाटी कोरी नको
आपली श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांचे खरे विचार समाजासमोर येऊ नये, हा त्यांचा उद्देश्य असतो. असे केले की आपल्या डोक्यात हवे तसे ते घालू शकतात. कारण तुमच्या बुद्धीची पाटी कोरी असते. म्हणून तर शिवाजी खरा कोण होता हे सांगणार्या पानसरेंना संपविले जाते. विज्ञानाधिष्ठीत समाज आन् तर्कसंगत विचार करायला शिकविणे यात आयुष्य व्यतीत करणार्या नरेंद्र् दाभोलकरांना भरदिवसा संपविले. परखड लिहिणार्या गौरी लंकेश यांनाही संपवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दहशतवादी संघटनांना स्वतंत्र विचार करणारी पिढी नको आहे. त्यासाठी त्यांचा आटापिटा आहे.
*स्वतंत्र विचारसरणी हवी
आपण स्वतंत्र विचार करायला शिकायला हवे. मेंढरासारख सगळे जग करतय म्हणून आपण तसेच करावे याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीचे कारण समजून घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली कोणालाही वापर करू देऊ नये.
No comments:
Post a Comment