नथुरामची बाजू घेताना इतिहासाचा आणि मुख्य म्हणजे त्या काळातील राजकारणाचा विचार करायला हवा.
1) इंग्रजाचे फोडा आणि राज्य करा असे धोरण होते. त्यानुसार इंग्रजांनी जात-धर्मातील भेदभाव वाढतील असे धोरण राबवून स्वातंत्र्यासाठी एकी होवू दिली नव्हती.
2) महात्मा गांधींच्या युगात मुस्लिमांनी स्वातंत्र्य चळवळीतील हिरिरीने भाग घेतला. त्यांच्या नेतृत्वाने सर्व समाज व देशाला एकसंघ केले.
3) जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येवू लागले. तसे बॅ.अली जीना यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाली. त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली . याला सुरुवातीपासून महात्मा गांधींचा विरोध होता.
4)नेमस्तपणाने मागण्या मान्य होत नाहीत, हे लक्षात आल्यावर जीनांनी आपल्या अनुयायांना आक्रमक होण्याचे आदेश दिले.
5) त्याचा परिणाम म्हणून बंगालसारख्या राज्यात दंगली भडकाविण्यात आल्या. दोन्ही समाजातील दंगली केवळ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर थांबवू शकतात, हे जीनांनी चित्र तयार केले.
6) तेव्हाचे गव्हर्नर यांनीही पाकिस्तान निर्मितीला मंजुरी दिली होती. पेटलेला देश पाहून गांधींनी पाकिस्तान होण्याला परवानगी दिली.
7) गोपाळ गोडसेंचे 55 कोटींचे बळी हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना भ्रमित करण्यासाठी पुरेसे आहे. भारताने पाकिस्तानला करारानुसार 55 कोटी देणे भाग होते. स्वतंत्र भारताचा हा पहिला करार देशाने पाळला नाहीतर जगात प्रतिष्ठा राहणार नाही, अशी गांधीजींची भूमिका होती. पाकिस्तानबरोबर भारताची युद्धे झाली. तरीही भारताने कित्येकवर्ष पाकला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा दिला होता. तेही कोट्यवधींचे नुकसान सहन करुन!
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Tuesday, May 21, 2019
नथूराम हे तर निमित्त आहे,खरा उद्देश्य वेगळाच
Saturday, May 18, 2019
नथुराम गोडसेला देशभक्त ठरविणे का फायद्याचे आहे?
1) नथूराम गोडसे या माथेफिरुने महात्मा गांधींचा खून नव्हे वध केल्याचे ठरविणे सोपे जाते. वध हा दुष्टांचा असतो. त्यामुळे महात्मा गांधी यांना खलनायक ठरवून त्यांच्या विचार प्रसाराला आळा घालता येतो.
2) नथुराम हा हिंदुराष्ट्रासाठी काहीही करू शकतो, तेव्हा असा आदर्श तरुणांसमोर ठेवून
बुद्धीभ्रम करणे त्यांना भडकविणे सोपे जाते.
3) बुद्धी अथवा संवादाहून हिंसाचार योग्य आहे, हे एकदा मनात व बुद्धीत बिंबवल्यास अशा व्यक्तींना कठपुतळीसारखे आॅपरेट करणे सोपे जाते.
4) महात्मा गांधींचे अथवा इतर महापुरुषांचे विचार तरुणाईला कळाल्यास ते स्वतंत्र विचार करण्याची भीती असते. त्यामुळे जो इतिहास आहे तो खोटा असे सांगुन मनाच्या कथा जोडता येतात.
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...