
मुंबई : अभिनेता किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढल्यामुळे सध्या ते सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. काही मंडळी किरण माने यांना पाठिंबा दर्शवत आहेत तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत.
‘मुलगी झाली हो’ मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींनी किरण मानेंवर गंभीर आरोप केले होते. अशातच किरण माने यांच्या पत्नी ललीता किरण माने यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
किरण माने गेली अनेक वर्ष मालिकांमध्ये काम करत आहेत. व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. तक्रार अर्जात किरण मानेंच्या पत्नीने लिहिले आहे, किरण माने पुरोगामी विचारवंत आणि लेखक आहेत. ते विविध माध्यमातून त्यांची वैचारिक भूमिका मांडत असतात. त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले आहे. निर्मांत्याच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. तसेच कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याने मानसिक तणावात आहे.
कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.
The post किरण मानेंच्या पत्नीने राज्य महिला आयोगाकडे केली तक्रार appeared first on The GNP Marathi Times.
source https://gnptimes.in/kiran-manes-wife-lodged-a-complaint-with-the-state-womens-commission/
No comments:
Post a Comment