Tuesday, February 21, 2023

शिंदे गटाची सत्ता आल्याने भारतीय राजकारणाला नवीन चाणक्यनीती कळाली!

 

पक्ष तुमचा असून जमत नाहीत, त्यामधील आमदार विकत घेण्याचे सामर्थ्य ज्याच्याकडे असेल त्याकडे पक्षाची मालकी असणार आहे. तुमच्याकडे बहुमत असण्यासाठी कामाच्या ठिकाणी असो की घरी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत राहा.

पक्षाची मालकी ही बहुमताने किंबहुना घोडेबाजाराने ठरणार असल्याने आपोआप पक्षचिन्ह, पक्षाचे नाव आणि कार्यालये मिळू शकतात. याचाच अर्थ घोडेबाजार हा फायद्याचा सौदा आहे. घोडेबाजार म्हणजे वेळ आली तर लाच द्या, पण आपले हित साधा.

पक्ष हायजॅक करताना पक्षातील लोकशाही, विधीमंडळातील सभागृहाचे नियम हवे तसे गुंडाळता येण्यसाठी केंद्रात तुमची ताकद हवी. नाहीतर ठाकरे गटाप्रमाणे वेळ येऊ शकते. निवडणूक आयोग असो की राज्यपाल हवे तसे नियम दाखवून पक्षाचे अस्तित्वच संपवू शकतात. त्यामुळे जे नियम दाखविणारे लोक किंवा यंत्रणा आहेत, त्यांच्याशी पंगा घेऊ नका. घेतला तर त्यांना पुरून उरेल असे कायद्याचे ज्ञान असणारे मित्र ठेवा.

भले तुमच्याकडे मातब्बर नेते नसतील पण जबरदस्त पाठिंबा देणारे कार्यकर्ते हवेत. नेते जिकडे मलिदा तिकडे वळतात. कार्यकर्तेच थोडीफार पक्षाची उरलीसुरली इज्जत वाचवू शकतात. याचाच अर्थ जीवाभावाची माणसे जवळ असावीत.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुणावर इतका विश्वास ठेवू नका की तुम्हाला स्वत:च्या घरात बेघर व्हावे लागेल. एकेकाळी ठाकरे यांचे विश्वासू असणारे शिंदे आज त्यांच्यापेक्षा वरचढ ठरले आहेत. खरेच एवढा विश्वास ठेवला नसता तर ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती. 

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....