Sunday, January 29, 2017

निवडणुकीची शाळा भरली अन पार्टी फुटली...


निवडणुकीची शाळा भरली अन पार्टी फुटली... निवडणुकीची शाळा भरली अन पार्टी फुटली...
शाळेची वेळ झाली आहे.. सर्वांनी आपापली दप्तरे आणली आहेत का?
अस जर सगळ्याच निवडणुकीतील पक्षाच्या नेत्यांना बोलाविले तर काय होईल?
अहो , आधीच निवडणुकीची शाळा भरलीय ना.. त्यामुळे फुटणा-या पार्ट्यांचेच खळ खट्याक होतात ना...
 कोणत्याही राजकारणाला  विचाराचा आधार असतो ही समजुत तरी लोकशाहीच्या देशात आधुनिक अंधश्रध्दा म्हणावी अशीच आहे..
कोणत्याही इमारतीला पाया असतो, भले त्यावर मजले बांधली जातील अथवा नाही. पण कोणत्याही पक्षाचा पाया असल्याचे दिसत नाही. कधी कोणतीही भुमिका ३६० अंशात फिरवायची म्हणुन केलेली सोय असे मातब्बरांना वाटत असेल तर भ्रम आहे.
जशी कॉम्प्युटरची ऑपरेटींग सिस्टीम ही यंत्रणा हाताळते. तसेच पक्ष प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आपली लोकशाहीचा डोलारा सांभाळत आहेत. पण मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीमची सुधारीत आवृत्ती येते. त्याप्रमाणे राजकीय पक्ष काही सुधारणा करतात का? गोंधळलेली कॉग्रेस, धड सत्ताधारी नाही विरोधकही नाही अशा पध्दतीने काम करणारी शिवसेना, आपल्याच मनोविश्वात गुंग असणारा मनसे पक्ष, तर जेथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करणारा राष्ट्रवादी यामुळे राज्यातीले एका पक्षालाही अजुन लोकांना ठामपणे सत्ता मिळण्याची खात्री नाही. यामुळे कमी-अधीक प्रमाणात उरलीसुरले दबावगट, जातीसंघटनाही निवडणुकीच्या सौदेबाजीत हात मारून घेतात. यामुळे लोकशाहीची लक्तरे टांगली जातात त्याची जबाबदारी कोण घेणार?
मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मातब्बर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्यामुळे भाजप अवाजवी आत्मविश्वासात आहे.
 आता राजकीय पक्षांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा  शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. ‘दुर्योधनाच्या बाजूला अनेक शकुनी मामा आहेत. भाजपची औकात काय, असे ते म्हणतात. २१ फेब्रुवारीला भाजपची काय औकात आहे, ते दाखवून देऊ,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले.
 भाजपची औकात काय आहे, हे २१ फेब्रुवारीला समजेल. तुमची औकात काय आहे ?,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला 

Monday, December 19, 2016

Marathi Journalist Prashant Chavan's Book- Kagadi Kate.

                                                    कवितेतून उलगडणार ‘वृत्तविश्व’
                                               ‘कागदी  काटे’चे येत्या शनिवारी प्रकाशन

बातमीदारातील धावपळ...या धबडग्यात बाजूला पडणारे पत्रकारांचे प्रश्न...त्याचबरोबर पत्रकारितेतील मूल्यांची होत असलेली घसरण...अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ले...बाजारू वृत्तीचा शिरकाव अन् पत्रकारितेतील विविध पैलू आता
कवितांमधून उलगडणार आहेत.
‘सहित प्रकाशन’तर्फे प्रकाशित करण्यात येणाऱया कवी आणि पत्रकार प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ या काव्यसंग्रहातून वृत्तपत्रसृष्टीतील ही आतील बाजू रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. चव्हाण यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह
असून, तो संपूर्णपणे पत्रकारिता विषयाशी संबंधित आहे. याकाव्यसंग्रहामध्ये 50 कवितांचा समावेश आहे. पत्रकारांचे वेतन, भाषाज्ञान, या क्षेत्रात शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्ती याचे दर्शन चव्हाण यांच्या या कवितांमधून घडणार आहे. यातून
 वृत्तपत्राचे जगच वाचकांसमोर येईल.
या विद्वानांना कधी कळलंच नाही..;
चांगला पत्रकार होण्यासाठी..
आधी चांगला ‘माणूस’ व्हावं लागतं....!
अशा शब्दांत ‘माणूसपण’ अधोरेखित करणारी ही कविता उपहास, विडंबन, अशा अंगाने फुलत जाऊन प्रसंगी काटेरी व बोचरीही झाली आहे. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी साकारले असून, मलपृष्ठ लेखन अजय कांडर यांनी केले आहे. कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पुण्यातील बॅ. नाथ पै. सभागृहात (एस. एम. जोशी फौंडेशन आवार, चवथा मजला, नवी पेठ, 30) ‘तरूण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर व 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे आणि कवी अजय कांडर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘सहित प्रकाशन’चे संपादक  किशोर शिंदे यांनी दिली.

Saturday, December 17, 2016

सावधान महाराष्ट्राचा बिहार होतोय..



महाराष्ट्र देशा ..कणखर देशा.. अस अभिमानाने म्हटले जाते.  समाजसुधारक तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्राने संपुर्ण देशात एक आदर्श घालून दिला आहे.   या पुरोगामी महाराष्ट्राचे तसेच संस्कृती परंपरेचे गोडवे गायले तर आपण कसाही गोंधळ घालायला मोकळे असा समज काही लोकांचा झालाय. विशेष म्हणजे ज्या राजकारणाच्या व्यवस्थेवर राज्याचा गाडा चालतो त्या विधानसभेतील आमदारांनी  व्यवस्थेतील सावळागोंधळ दाखवून दिला आहे.
राज्यातील कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिका-यांविरुध्द राजकीय नेते सुडाचे राजकारण दाखविण्याची सीमाच ओलांडली आहे.एकतर काही मोजकेच अधिकारी असे आहेत की सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांचे काम चोख असते. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला तरी विरोधक कशाला साध देतील हे सामान्य नागरिकांनी ओळखलेले आहे.
राज्यात जे मोजके सनदी अधिकारी अत्यंत कडक शिस्तीचे आणि कार्यक्षम आहेत. त्यांना सतत राजकीय रोषाला बळी पडावे लागते. लोकसेवक म्हणुन घेणारे नेते या अधिका-यांना टार्गेट करून नेमकी कुणाची सेवा करू इच्छितात हा प्रश्न सामन्य जनतेला पडला आहे. गुंडगिरी, गुन्हेगार   आणि अल्पशिक्षित नेते आता राजकीय पक्षांनीच हद्दपार करावेत. कारण त्या पक्षांच्या विश्वासहर्तेचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीवरील विश्वास बेताल नेत्यामुळे उडत चालला आहे.
अमरावती महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची यादी दाखविली नाही म्हणुन आमदार सुनील देशमुख यांनी विधानसभेत तक्रार केली. विधिमंडळाच्या विशेषाधिकार भंग यांनी दोषी ठरवले. त्यांना विधिमंडळाच्या सुरक्षा अधिका-यांच्या देखरेखीखाली ठेवावे अशी शिक्षा दिली. एका प्रामाणिक सनदी अधिका-याला अशी शिक्षा दिली जात असताना महाराष्ट्रात उठसुठ चिल्लर विषयावर बोलणारे नेते मात्र आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे गप्पच होते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
राजकीय नेत्यांनी सुडाचे राजकारण करणे सोडावे.  कार्यक्षम  आणि व्यवस्थेला शिस्त लावणा-या अधिका-याने स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. आतातरी शहाणे व्हा.  महाराष्ट्राचा बिहार करायला जाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. कारण मतदार सुज्ञ आहेत. अशा नेत्यांचे मोरल स्ट्राईक करण्यासाठी सामान्यांनी संघटीत होण्याची नितांत आवश्यकता आहे.


Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....