|
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Friday, October 11, 2013
Thursday, October 3, 2013
घोटाळ्यामुळे देशात लोकशाही टिकुन ?
देशात घोटाळे होतात आणि त्यामुळे लोकशाही टिकून राहते हे वाचून धक्का बसला असले तरी हे एक सत्यच आहे.त्याचे असे आहे की भारत हा अवाढव्य असणारा लोकशाही देश आहे.भले कुणीही घराणेशाहीचा आरोप करत गांधी घराणे घराणेच्याचीच सत्ता चालते असा आरोप केला तरी सध्या तरी लोकशाही आहे असेच म्हणावे लागते.बरे देशाची लोकसंख्या आणि आकारमान पाहता कोट्यवधींचे घोटाळे होतात .त्यातही २ जी स्पेक्ट्रम आणि कोळश्याचे लाख कोटींचे घोटाळे असल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.उलट देशाचा विकासदर शेअरमार्केटवर जसा मोजला तसा घोटाळ्याच्या आकडेवारीवरून मोजायला हरकत नसावी.
हवेतर नियोजन आयोग गरीबी्ची ज्या काटेकोर पध्दतीने व्याख्या करीत असते त्याचपध्दतीने विकासाचे निर्देशांक घोटाळ्याच्या आकेडेवरीवरून मोजण्याची आवश्यकता आहे.
शेवटी देशात एवढी प्रगती होत असतानाही स्थिरता टिकविण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यातील आघाडी सरकारलालाही कसरत करावी लागते.केंद्रामध्ये कधी वैचारीक(=आर्थिक) मतभेद झाले तर युपीए सरकारमधील पक्ष पाठिंबा काढुन घेण्याची धमकी देतात.तेव्हा खर्या अर्थाने राजकीय पक्षांच्या नेत्यांचे घोटाळे हेच कामाला येतात.अश्या घोटाळ्यामुळे अटकेची भीती दाखवीत केंद्र सरकार देशातील सरकार स्थिरता टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते.भले त्यासाठी कायद्याचे उल्लघंन करण्याची वेळ आली तरीही सीबीआय सर्वोच न्यायालयाचा रोषही स्वीकारते!केवढी ही देशभक्ती!!!त्यामुळे सरकार मायबाप घोटाळे करते आणि घोटाळे करणार्याला अभय देते .यामागे देशात लोकशाही टिकवून ठेवणे हा उदात्त विचार आहे.हा विचार उदात्त आपण समजुन घेतलाच असेल पण लोकशाही अजुनही समजुन घेत नाही .......कधी कधी दम तोडते आणि सर्वोच न्यायालयाला गुन्हेगार लोकप्रतिनिधीवर अकुंश ठेवण्याची गरज वाटू लागते.राजकुमाराचे लॉन्चिंग होणार असल्यामुळे केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले आहे.आता सामान्य जनतेच्या मनात एक गाणे गुणगुणत असेल कोई प्यार कर ले झुठा ही सही........(निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या प्रेमात पडणे नैसर्गीक आहे)
Wednesday, October 2, 2013
बातम्यासाठी पैसे!
लातूरहुन पुण्याकडे रेल्वेतून येत होतो.प्रवासात सहजच बोलता बोलता नव्या ओळख्या होत असतात.खरे तर मला प्रवासात फारशी बोलायची सवय नाही.परंतू एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण माणुसघाणा आहोत असा आर्विभाव आणणे आवडत नाही.त्यामुळे साहजिकच मी त्या व्यक्तीला बोलायला सुरूवात केली.तो ग्राफीक डिझायनरम्हणून मुंबईत काम करीत होता.त्याला मी एका दैनिकात बातमीदार म्हणुन काम करीत असल्याचे सांगितले.नेहमी अशी ओळख सांगितली तर काय पत्रकारांचे किती वजन असते.त्यांची कामे पटापटा होत असतात असे सांगुन पत्रकार हे चांगले असतात यापेक्षा पत्रकारिता करणे किती फायदेशीर असतात हेच सांगायला सुरूवात केली.प्रत्यक्षात बातमीदारी करत असताना जगण्याची भ्रांत होत असताना त्याचे कौतुक ऐकत असताना हसू येत होते आणि रागही आला होता.त्यानंतर गावरान भाषेत ज्याला खाज म्हणायचे अशी बातमीदारीची खाज असते ती काहीही सुटत नाही.लागलीच फुकट्ची बडबड चांगला श्रोता होत ऐकुन घेतल्याचे बिल वसूल करण्यासाठी मी एक बॉम्ब टाकला.काही चांगला राज्यस्तरीय विषय असल्यास सांगा असा तो बॉम्ब होता.खरेतर बॉम्ब नव्हता.पण याशिवाय आपण कधी काही अपेक्षा केलीच नाही.त्यामुळे प्रत्येक विषय बातम्यांच्या बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये घुसत जातो.त्यावर चांगल्या सोर्सची लक्षणे दाखवत त्या बहाद्दरने लागलीच बातमी सांगितली की तो राहतो त्या परिसरात झोपडपट्ट्या असून वनविभागाच्या झोपडपट्ट्यावर कारवाई करण्यात आली आहे.पण हॉटेलवर कारवाई करण्यात आली नसल्याची त्या व्यक्तीने माहिती दिली.सगळी कागदपत्रे तुम्हाला देतो ,पण पाच हजार रूपये द्यावी लागतील असे सांगितले.माझा थोडासा कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवरचा विश्वास उडाला असल्याने मी सांगितले बातम्या प्रकाशीत करण्यासाठी पैसे नसतात.त्याने ठासून सांगितले की बातमी देतो तुम्ही पैसे द्या.मी धक्का बसल्याने सावरत हे कसे शक्य आहे ,आम्हाला ऑफीसकडून पैसे नसतात असे समजावित सांगत होतो.त्याने मात्र मार्केटींगचे कुशल दाखवित तुम्हाला पैसे मिळो अथवा न मिळो .मी तुम्हाला बातमी फुकट का सांगायची असा त्याने सवाल केला.मी थोडासा खजील झालो आणि विचार करू लागलोय .वर्तमानपत्रात अजुनही बातम्यांच्या संख्येवर पगारी दिल्या जात नाहीत.बातम्या दिल्याने पैसे मिळविण्याची अपेक्षा केली जात असेल तर यापेक्षा लोकशाहीचे भाग्य कोणते? शेवटी माझा या अजब-गजब लोकशाहीला सलाम !गडगडणारा लोकशाहीच्या स्तंभाला टेकू हवाय का ?
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...