Wednesday, October 2, 2013

बातम्यासाठी पैसे!

लातूरहुन पुण्याकडे रेल्वेतून येत होतो.प्रवासात सहजच बोलता बोलता नव्या ओळख्या होत असतात.खरे तर मला प्रवासात फारशी बोलायची सवय नाही.परंतू एखादा व्यक्ती बोलत असेल तर आपण माणुसघाणा आहोत असा आर्विभाव आणणे आवडत नाही.त्यामुळे साहजिकच मी त्या व्यक्तीला बोलायला सुरूवात केली.तो ग्राफीक डिझायनरम्हणून मुंबईत काम करीत होता.त्याला मी एका दैनिकात बातमीदार म्हणुन काम करीत असल्याचे सांगितले.नेहमी अशी ओळख सांगितली तर काय पत्रकारांचे किती वजन असते.त्यांची कामे पटापटा होत असतात असे सांगुन पत्रकार हे चांगले असतात यापेक्षा पत्रकारिता करणे किती फायदेशीर असतात हेच सांगायला सुरूवात केली.प्रत्यक्षात बातमीदारी करत असताना जगण्याची भ्रांत होत असताना त्याचे कौतुक ऐकत असताना हसू येत होते आणि रागही आला होता.त्यानंतर गावरान भाषेत ज्याला खाज म्हणायचे अशी बातमीदारीची खाज असते ती काहीही सुटत नाही.लागलीच फुकट्ची बडबड चांगला श्रोता होत ऐकुन घेतल्याचे बिल वसूल करण्यासाठी मी एक बॉम्ब टाकला.काही चांगला   राज्यस्तरीय विषय असल्यास सांगा असा तो बॉम्ब होता.खरेतर बॉम्ब नव्हता.पण याशिवाय आपण कधी काही अपेक्षा केलीच नाही.त्यामुळे प्रत्येक विषय बातम्यांच्या बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये घुसत जातो.त्यावर चांगल्या सोर्सची लक्षणे दाखवत त्या बहाद्दरने लागलीच बातमी सांगितली की तो राहतो त्या परिसरात झोपडपट्ट्या असून वनविभागाच्या झोपडपट्ट्यावर कारवाई करण्यात आली आहे.पण हॉटेलवर कारवाई करण्यात आली नसल्याची त्या व्यक्तीने माहिती दिली.सगळी कागदपत्रे तुम्हाला देतो ,पण पाच हजार रूपये  द्यावी लागतील असे सांगितले.माझा थोडासा कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवरचा विश्वास उडाला असल्याने मी सांगितले बातम्या प्रकाशीत करण्यासाठी पैसे नसतात.त्याने ठासून सांगितले की बातमी देतो तुम्ही पैसे द्या.मी धक्का बसल्याने सावरत हे कसे शक्य आहे ,आम्हाला ऑफीसकडून पैसे नसतात असे समजावित सांगत होतो.त्याने मात्र मार्केटींगचे कुशल दाखवित तुम्हाला पैसे मिळो अथवा न मिळो .मी तुम्हाला बातमी फुकट का सांगायची असा त्याने सवाल केला.मी थोडासा खजील झालो आणि विचार करू लागलोय .वर्तमानपत्रात अजुनही बातम्यांच्या संख्येवर पगारी दिल्या जात नाहीत.बातम्या दिल्याने पैसे मिळविण्याची अपेक्षा केली जात असेल तर यापेक्षा लोकशाहीचे भाग्य कोणते?  शेवटी माझा या अजब-गजब लोकशाहीला सलाम !गडगडणारा लोकशाहीच्या स्तंभाला टेकू  हवाय का ?

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....