Monday, November 25, 2013

जमीनव्यवहार ठरतेय काळ्या पैश्यावाल्यासाठी सोन्याची खाण

 

जमीनव्यवहार करण्यासाठी ग्रामीण विभागात शहरालगत दलालाच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.या टोळ्यांनी शेतकरीवर्गाचा जीवाला घोर लावला आहे.शेतकर्‍यांना शेती करायची आहे तर दलालांना जमीनी विकायच्या आहेत.जमीनी विकुन खुळखुळणारा पैसा  दिसणारा पैसा दुसरीकडे काळीआई दिसत असताना त्याची  कमालीची जीवाची घालमेल होते.परंतु दलालांच्या टोळ्या ह्या गुंड आणि राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने चालत असल्याने अनेक शेतकर्‍यांचा निरूपाय झाला आहे.अनेक बांधकाम व्यावसायीक तसेच अवैध मार्गाने कमविणार्‍या शासकीय अधिकार्‍यासाठी ह्या जमीनी सोन्याची खाणी ठरत आहेत.थेट जमीनीत पैसा गुंतविला जात असल्याने  तसेच जमीनीत ठरणारी फायदेशीर गुंतवणुक यामुळे रिअल इस्टेटची जोरदार डिमांड वाढत आहे.प्रत्यक्षात रिअल इस्टेटमधील प्रगती म्हणजे खरी प्रगती आहे का याचाही विचार करायला हवा.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....