Thursday, November 28, 2013

कॉलेज गेट

  

मराठी साहित्यात कॉलेज गेट नावाची एक कादंबरी तुफान गाजतेय. वाचायला सुरूवात केली आणि अक्षरश: कॉलेजगेट मध्ये फिरतच राहिलो.वाचकाने स्वकथन करत असतानाची शैली ही अशी भन्नाट आहे की आपल्याला वाटते , हा तर आपला बेस्ट मित्र बोलत आहे!
 क़ॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक जण कीडा असतो.म्हणजे काहीतरी भन्नाट करण्याची उर्मी आणि त्यासाठी झोकुन देण्याची वृत्ती हीच पुढे कुठेतरी जपा अशीच ही कादंबरी सांगते.फरिीजीवन जगत असताना मस्त कलंदर जगणारे मित्र ,शब्दाखातर जीवाला जीव देणारे यारी आणि बरेच काही आहे.सांगु का ? वाचल्याशिवाय ह्या पुस्तकाची गंमत कळायची नाही.पुस्तकातील प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद करत असतात.खुप काही आहे ..सुहास शिरवळकरांची दुनियादारीपेक्षा मला हे पुस्तक आवडले.कारण आजच्या तरूणाईची भाषा आणि चालु काळातील ती वास्तववादी आहे.

No comments:

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....