मुबंइ महापौर निवासस्थानाजवळ शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा पुतळा उभा केला जात असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जी आखडपाखड केली आहे, त्यामुळे मराठी माणसात साधी एकजूट नसल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.हे सिध्द करण्यातही राज ठाकरेंना राजकारण दिसत असेल तर यासारखे दुसरे मराठी माणसाचे कोणते दुर्दैव असेल ? भाजप व शिवसेनेमधून सध्या विस्तवही जात नाही , पण भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध पुतळ्याला विरोध केला तर नाहीच उलट शिवसेनेच्या नेत्यासोबत जाहीर पत्रपरिषद घेवून स्पष्ट अनुकुलता दाखविली आहे. प्रथमच मराठी माणसाच्या स्वाभामिमानासाठी प्रेरणा देणा-या आणि अत्यंत आक्रमपणामुळे मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणा-या बाळासाहेबांचे स्मारक उभा करण्यातील प्रकरणातून घरातीलच भाऊबंदकीचा शाप सामान्य मराठी माणुस ते प्रतिष्ठीत व्यक्तींना चुकला नाही. खरे तर आपण आपलेच पाय किती दिवस ओढण्यासाठी ओळखले जाणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचे स्मारकाचा विषय शिवसेना फायद्याच्या राजकारणासाठी करणार असली किंवा महापौर निवासस्थानाचा डोळा आहे म्हणून पुतळ्याला विरोध करणे म्हणजे पायाला वेदना होतात म्हणून कापून काढण्यासारखे आहे. काहीवेळेस राजकीय व्यक्तींनी राजकीय हेवेदावे सोडून प्रगल्भपणा दाखवणे अपेक्षीत आहे. पण कधी कधी याचा विसर पडला तर राजकीय पांघरूण किती मळकट हे दिसून येते.
राज ठाकरे यांनी मुंबईतील बिल्डरलॉबी आणि शिवसेना यामधील लागेबांध्यावरील टीका योग्य केली आहे. स्मारकाला पर्यायी जागा उपलब्ध होत असल्याने मुंबईतील शासकीय जागांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पण यासाठी पुतळ्याला विरोध इंजीनाचे टायमींग चुकल्याचे दिसून येते.
राज ठाकरे यांनी सध्या फक्त विरोध आणि विरोधाचेच विषय मांडायला सुरूवात केली आहे. कोणत्याही पक्षप्रमुख प्रचंड त्याग आणि सकारात्मक विचार समाजाला देवूनच समाजाला विकासासाठी नवप्रेरणा, नवशक्ती देण्याची भूमिका स्वीकारावी लागते. याबाबतीत त्यांनी कसलेही धोरण, विचार न करता मांडण्यात येणारे उथळ वक्तव्ये ही भरकटलेली आहेत. शेजारील बिहारी लोकांचे लोंढे जसे पाहिले तसे नितीशकुमारांची कार्यपध्दती पहायला हवी.
परप्रांतीय जरी मेहनती असले तरी मराठी माणसाचा सरळपणा आणि बंधुभावाचा अधिक गैरफायदा घेतात. त्यांच्यामध्ये असणारी एकता ही त्यांच्या विकासासाठी पोषक असते. परंतू मराठीमाणसाने मी पणा सोडावा आणि एकतेसाठी प्रयत्न करावा. मनसे आणि शिवसेनेचे एकीकरण होवो अथवा न होवो पण मराठी माणुस म्हणुन अस्मितेचा विषय येतो तेव्हा एकी हवीच, यामुळे राज ठाकरे हे चुकलेले आहेत असेच म्हणावे लागेल..
पत्रकारितेचा वसा हाती घेतला असून मराठी हित असेल तिथे आम्ही असेच ठासून बिनधास्त ठासून मत मांडणार आहोत...!
No comments:
Post a Comment