Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Sunday, January 10, 2016
दहशतवादाला अंतीम उत्तर काय असू शकते ?
लव्ह सिटी पॅरीसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एका नागरिकाची पत्नी मरण पावली. या घटनेनंतर त्या नागरिकांनी आपल्या मुलांचे संगोपन आणि दिनचर्या दुस-या दिवसापासून जशी होती तशीच चालू ठेवली आणि अतिरेक्यांना प्रसिध्दीमाध्यमातून संदेश दिला. तुम्ही माझी प्रिय व्यक्ती हिरावून घेतली. पण माझा तुमच्यावर राग नाही. आजही माझे आयुष्य तुमच्या धाकात नाहीतर माझ्या मर्जीने चालू आहे. स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा जगाला संदेश देणारा फ्रान्स देश किती प्रखर देशभक्त आणि सशक्त आहे हे याचे बोलके उदाहरण होय.
नुकताच पठाणकोट येथील हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावले आहेत. भारतात केवळ पाच-सहा अतिरेकी येतात आणि देशाच्या लोकशाही आणि धर्माच्या नावाखाली एकतेलाच
सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मानवतेला कलंक लावणारे आहे.
मुळात पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध तयार होताना अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्याचा चेव येण्यामागे मानसशास्त्र काय आहे? कुणीही काहीही म्हणो दहशतवाद हे प्रथम लोकमानसिकतेच्या आधारावरच जास्त खेळले जाते. त्याचे असे आहे की सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसला आणि अस्थिरता, अनिश्चितता निर्माण झाली की दहशतवाद्यांची मोहीम फत्ते होते. जागतीक पातळीवर असणा-या इसिसने भारताविरूध्दही युध्द पुकारले आहे. सगळेच देश दहशतवादाने होरपळून निघत असताना दहशतवादाला अंतीम उत्तर म्हणजे त्यांच्या भीतीला कसलीच भीक न घालणे. हिंदु-मुस्लीममध्ये दरी निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. दुसरे म्हणजे कधीही आम्ही कुठेही हल्ले करू शकतो हे दाखवून त्यांना आपले सामर्थ्य असल्याचा भ्रम तयार होतो. सध्या इसिसपाठीमागे कोणता देश कोणता विचार आहे यापेक्षा कोणत्या परिस्थितीतून हा दहशतवाद जन्माला आलाय याचा विचार केला तर इसिस काय हे कळू शकते.
तेल इंधनच्या विहिरी आणि युरोपीराष्ट्रांचे युध्द
आसुरी महत्वांकाक्षा आणि धर्माचा बुरखा घातला तर कुत्र्याचाही वाघ होतो हे इसिसने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
१) दहशतवादी तयार होतात. यामागे त्यांचा ब्रेनवॉश केला जातो. अशा पध्दतीचा अभ्यास करून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
२) दहशतवाद हा मुस्लीमविरोधी असून त्याला समर्थन देणा-या विद्वान मौलाना, मुस्लीम विचारवंत आणि सुधारणावादी विचारवंत, महिला यांना प्रोत्साहन द्यायला हवे.
३) दहशतवादाचे तरूणामध्ये आकर्षण असून यामुळे आयुष्य कसे उध्दवस्त होते हे युवकापर्यंत थेट पोहोचवायला हवे.
४) जे युवक अत्यंत क्रियाशील परंतू भावुक आहेत त्यांचा ओढा दहशतवादाकडे असू शकतो अशा सुशिक्षीत तरूणांची शक्ती नवनिर्मीतीकडे वळवायला हवी. उदाहरणार्थ मुस्लीमबांधवात गरीबीमुळे अनेकांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना शिकविण्यासाठी असे युवक चांगले योगदान देवू शकतात.
५) समाजात गुन्हेगारी कडे वळलेला, गरीबीमुळे त्रस्त असा युवकवर्गाला दहशतवाद हे सोपे कमविण्याचे साधन वाटू शकते, अशी वेळच येवू नये म्हणुन शासनाने त्यांना सक्तिने स्वच्छता व तत्सम सेवेस लावून अन्न, वस्त्र द्यायला हवे.
दहशतवादाचा सामान्यावर कसलाच परिणाम होवू न देणे हेच अंतीम उदाहरण आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...
No comments:
Post a Comment