रस्त्यावर एक गाडा आहे.नेहमीसारखीच तिथं वर्दळ आहे. मच्छी फक्त ३०,४० अन् ५० रुपयांना आहे. खरेतर हा दर कुणालाही परवडणारा आहे. नवरा बायको अन त्यांची लेकरे दोघांजवळ आहेत. भिरभिरणार्या नजरेने त्या गाड्यावरील पदार्थ पाहणारी कदाचित त्याची मेहुणीही आहे. दोन्ही लेकरांच्या डोळ्यातील भुकेचा उसळलेला डोंब लपू शकत नाही. तो घासाघीस करत राहतो. त्याला २० रुपयात मच्छी हवी आहे. पण गाडेवाल्याच म्हणण २रुपये मिळतात. त्यातही घासाघीस परवडत नाही. हे ऐकून दोघींच्याही चेहर्यावर दिसणारी दुर्बलता. याचे उत्तर आरबीयच्या रेपोकडे नाही की जागतिक बँकेने भारताच्या विकासाच्या आकडेवारीत. गाडेवाल्याच लक्ष फक्त आता मच्छी तळण्याकडे आहे. मलातर सगळे विकासाचे अहवाल कढईत गेलेले दिसू लागतात. तेवढ्यात एक कुत्र काहीतरी खाण्याच्या उद्देशाने येते. गिर्हाईक त्याला हाकलून देण्यासाठी किरकाळतात.मग कुत्रा कसबस निघत. तिकडे हा माणूसही निघतो. मध्येच गाडेवाला पोर्याला ओरडतो. कामे नीट कर म्हणून. तो केवळ हाडाचा सापळा झालेला. घागर उचलताना स्पष्ट दिसत. गरिबीमुळे चिपाड झालेल्या शरीरात अवसान पुन्हा भुकेनेच आणलेले असते. भुकेला भारत रात्रीच्या अंधारात मिस्टर इंडियासारखा गायब होत जातो.
Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...
No comments:
Post a Comment