आॅनलाईन आणि तंत्रज्ञानाने ग्रामीण भागातील नागरिकांना किती फायदा होवू शकतो, हे पाहायचे असेल तर लातुरचा आरोग्यरथ पाहा!
बहुधा देशातील पहिलीच एवढी अद्ययावत गावोगाव, दुर्गम सेवा देणारी टेलिमीडिसनची सेवा असेल. ग्रामीण भागात अनेकांना शहरात यायचे असेल तर केवळ तिकीटासाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागते. तेव्हा दवाखान्याचा खर्च , तपासण्या आणि औषधांचा खर्च तर त्यांना अक्षरश: चैनीची गोष्ट वाटते. त्यामुळे काहीजण अंगावर दुखणे काढतात. आजार, विकार बळावल्यास शेवटी घरातले लोक कर्ज काढून उपचार करतात. अशी परिस्थिती ओढवताना काही करता येईल का तर याचे ठोस उत्तर आरोग्यरथने दिले आहे.
गावात येणारा आरोग्य रथ म्हणजे प्रशिक्षीत नर्स, डाॅक्टर आणि अद्ययावत रुग्ण तपासणीची उपकरणे असलेले वाहन!या सेवेतून केवळ दहा-वीस रुपयात डाॅक्टर रुग्णांना तपासतात. रुग्णांना शहरात जाण्यासाठी तिकीट खर्च नाही अन् अल्प दरात तपासणी यामुळे रुग्णांना चांगला फायदा होत आहे. अनेक तज्ज्ञ डाॅक्टर त्वचारोग, दमा अशा विविध आजारावर आरोग्यरथाच्या माध्यमातून शिबीर घेत आहेत.
डेक्कन हेअल्थ सर्व्हिसेस तर्फे मोफत अस्थिविकारासारखे विविध तपासणी शिबीर संपन्न पार पडत आहेत.
DHS संस्था संचलित आरोग्यरथ या उपक्रमादवारे आरोग्याबद्दल जनजागृती, सर्वसाधारण रुग्ण तपासणी, व टेलिमेडिसिन या तंत्रज्ञानदवारे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्यतपासणी शिबीर घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रात प्रथमच आरोग्यरथतर्फे Realtime टेलिमेडिसिन हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे , रुग्णांना त्यांच्या त्यांच्या घराजवळच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळत आहे. तसेच तज्ज्ञांना सुद्धा अगदी त्याच्या OPD मध्ये बसून दूरचे patient चेक करता येत आहेत. त्यामुळे लातूरच्या आरोग्यसेवेत मोलाची भर पडत आहे.
या आहेत आरोग्यसुविधा
१. कॉम्पुटराइज्ड नोंदणी ( EMR ) नोंदणी यामध्ये रुग्णाचे सर्व आरोग्य विषयक
नोंदणी करून हेल्थ कार्ड
२. BP तपासणी
३. इलेकट्रॉनिक स्टेथो द्वारा हृदयाची तपासणी
४. ECG - करून टेलिमेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर तज्ज्ञाचा सल्ला
५. रक्तातील साखर BSL -
६. spo2 - रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे.
७. Foetal Doppler दवारे गर्भातील बाळाच्या हृदयाचे स्पंदन तपासणे.
८. स्पायरोमेट्री फुफूसाच्या कार्यक्षमतेची तपासणी ( दमा,श्वासनलिका )
9 हाडांच्या व मणक्याचे आजार
इत्यादी तपासण्या.
या टेलिमेडिसिन हे तंत्र प्रथमच आरोग्यरथ उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे व याचा फायदा सर्वसामान्य जनतेला व्हावा यासाठी आठवड्याला एक मोफत आरोग्यशिबिर घेत असल्याचे डॉ. अविनाश समुद्रे, डॉ दत्ता आंबेकर यांनी सांगितले.
आरोग्यरथात फार्मसिस्ट विष्णु, डॉ किरण खेर्डेकर यांचाही सहभाग असतो.
या आरोग्यसेवेसाठी संस्थेचे सहसंस्थापक डाॅ. दत्ता अंबेकर हे स्वत: रुग्ण तपासणी करतात. यापूर्वी पानगावला त्यांनी केलेली रुग्णसेवा पंचक्रोशीतील नागरिक विसरले नाहीत. अनेकदा ताटावरुन उठून ते पेशंटला तपासण्यासाठी गेले आहेत. दिवस-रात्र केवळ व्रतासारखे काम करताना त्यांनी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. गरिबांना अल्पदरात रुग्णसेवा देण्याची तळमळ मात्र कमी झाली नाही.
डाॅ. अविनाश समुद्रे हे एमएनसी कंपनीत उच्चपदावर आहेत. ते खास आरोग्यरथ उपक्रमासाठी दुबईतून भारतात येतात. आपल्या भागातील लोकांसाठी ज्या काही उत्कृष्ट सेवा आहेत, त्या आरोग्यरथातून देण्याचा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल स्वदेस सिनेमाची तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
डेक्कन हेल्थ सर्व्हिसेसच्या आरोग्यरथाचा अनेक गरजू, गरीब रुग्ण लाभ घेत आहेत. आनंदाची बाब म्हणजे अनेक डाॅक्टर यातून शिबीरे घेत रुग्णसेवेचा परीघ वाढवित आहेत. यात वरचेवर वाढ होत जाऊन गरजू, गरीब रुग्ण असेल हे निर्वावाद!
लातूर परिसरात मोफत आरोग्यशिबिर घ्यायचे असल्यास ८३८०९८११०० या क्रमांकावर संपर्क करावा.
डाॅ. दत्ता अंबेकर
निर्मल हाईटस, तिसरा मजला,
अंबाजोगाई रोड लातूर
No comments:
Post a Comment