ईव्हीएम मशीनच्या निमित्ताने पुन्हा एकदा लोकशाहीतील गोंधळ जगजाहीर झाला आहे.लोकशाहीचे बरे असते अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर लोकशाहीच्या पायावरच हल्ले करण्याची सोय असते.
If you want overule them, confuse them. या मार्गाने जसे सत्ताधारी असतात, तसेच त्याच वाटेवरुन विरोधक चालतात. विरोधक अजनूही भाजपची नस सापडण्यासाठी चाचपडत आहे. त्यातूनच ईव्हीएम मशिनचे प्रकरण तयार केले जात असल्याचा भाजपचा दावा आहे.
कोणाचे बरोबर आणि चूक आहे हे ठरविण्यापेक्षा मुद्दा काय आहे तपासले पाहिजे. हॅकिंगची दिशा राजकीय कारणाने असो अथवा नसो तांत्रिक मुद्दा अभ्यासाला हवा.
सायबर हॅकरने पाच वर्षे मौन बाळगल्याने त्याच्या हेतूबाबत शंका निर्माण होत आहे. आपल्यावर हल्ला झाल्याचाही त्याने दावा केला आहे. असा प्रकार घडत असताना त्याने एकाही नेत्याचे नाव घेतले नाही ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. याचा दुसरा अर्थ त्याला भारतीय नेत्यांपासून जीवाची भीतीही आहे. अमेरिकेने राजाश्रय दिला असताना भारताने त्यावर दिल्लीत गुन्हा नोंदविला आहे. आधीच लोकशाहीचे धिंडवडे निघाले त्यात राजकीय शहाणपण दाखविण्याची संधीही भारताने गमाविली आहे.
ईव्हीएम मशीन हा लोकशाहीचा टेकू ठरू नये याची काळजी घेतली पाहिजे. ते खोट आहे हे सिद्ध करण्यापेक्षा व्यवस्थेमधील तांत्रिक दोष काढण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.
ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होत असल्याचे आरोप झाले आहेत. त्यावेळी राष्ट्रीय निवडणूक आयोगान सर्व राजकीय पक्षांना ईव्हीएममध्ये छेडछेड करण्याचे आव्हान दिले होते. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने हे आव्हान स्विकारले नव्हते. आपनेही दिल्लीच्या विधानसभेत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्याचा दावा केला. प्रत्यक्षात ते ईव्हीएम मशीन नव्हते असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
No comments:
Post a Comment