Thursday, October 3, 2013

घोटाळ्यामुळे देशात लोकशाही टिकुन ?
 देशात घोटाळे होतात आणि त्यामुळे  लोकशाही टिकून राहते हे वाचून धक्का बसला असले तरी हे एक सत्यच आहे.त्याचे असे आहे की भारत हा अवाढव्य असणारा लोकशाही देश आहे.भले कुणीही घराणेशाहीचा आरोप करत गांधी घराणे घराणेच्याचीच सत्ता चालते असा आरोप केला तरी सध्या तरी लोकशाही आहे असेच म्हणावे लागते.बरे देशाची लोकसंख्या आणि आकारमान पाहता कोट्यवधींचे घोटाळे होतात .त्यातही २ जी स्पेक्ट्रम आणि कोळश्याचे लाख कोटींचे घोटाळे असल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.उलट  देशाचा विकासदर शेअरमार्केटवर जसा मोजला तसा घोटाळ्याच्या आकडेवारीवरून मोजायला हरकत नसावी.हवेतर नियोजन आयोग गरीबी्ची ज्या काटेकोर पध्दतीने व्याख्या करीत असते त्याचपध्दतीने विकासाचे निर्देशांक घोटाळ्याच्या आकेडेवरीवरून मोजण्याची आवश्यकता आहे.
शेवटी देशात एवढी प्रगती होत असतानाही स्थिरता टिकविण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यातील आघाडी सरकारलालाही कसरत करावी लागते.केंद्रामध्ये कधी वैचारीक(=आर्थिक) मतभेद झाले तर युपीए सरकारमधील पक्ष पाठिंबा काढुन घेण्याची धमकी देतात.तेव्हा खर्‍या अर्थाने राजकीय पक्षांच्या नेत्यांचे घोटाळे हेच कामाला येतात.अश्या घोटाळ्यामुळे अटकेची भीती दाखवीत केंद्र सरकार देशातील सरकार स्थिरता टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते.भले त्यासाठी कायद्याचे उल्लघंन करण्याची वेळ आली तरीही सीबीआय सर्वोच न्यायालयाचा रोषही स्वीकारते!केवढी ही देशभक्ती!!!त्यामुळे सरकार मायबाप घोटाळे करते आणि घोटाळे करणार्‍याला अभय देते .यामागे देशात लोकशाही टिकवून ठेवणे हा उदात्त विचार आहे.हा विचार उदात्त आपण समजुन घेतलाच असेल पण लोकशाही अजुनही समजुन घेत नाही .......कधी कधी दम तोडते आणि सर्वोच न्यायालयाला गुन्हेगार लोकप्रतिनिधीवर अकुंश ठेवण्याची गरज वाटू लागते.राजकुमाराचे लॉन्चिंग होणार असल्यामुळे  केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले आहे.आता  सामान्य जनतेच्या मनात एक गाणे गुणगुणत असेल कोई प्यार कर ले झुठा ही सही........(निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या प्रेमात पडणे नैसर्गीक आहे)

1 comment:

Paresh Kale said...

Politics is a dirty game played by (mostly) dirty minded people ! Great that u r cleaning them :-)

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....