परतलेला भूकंप
नेपाळमधील भूकंपानंतर भारतातील भुकंपप्रवण क्षेत्र आणि लातुरमधील किल्लारीसारख्या विनाशकारी भुकंपाच्या आठवणी जाग्या होत आहेत. आपण भारतीय हवामान बदलावे तसे आपले प्रश्न प्राध्यान्याने ठेवतो. प्रत्यक्षात त्याची कधीच तड लावत नाहीत.मुंबईसारख्या ठिकाणी २० मजल्यापेक्षा परवानगी द्यायला तज्ञांचा विरोध आहे. तर अनेक ठिकाणी भुंकपरोधक घरे म्हणजे काय असतात भाऊ... असाच प्रश्न नागरीकांना पडलेला असतो. भुकंप मापन केंद्रे जर धुळखात पडू लागली तर कोणाच्या भरवश्यावर रहावे ? जिल्ह्याच्या आपात्कालीन यंत्रणाही अशाच कागदोपत्री बळकट आहेत. अशा कार्यालयात माजी सैनीकांना आपात्कालीन यंत्रणेत कायमस्वरूपी घ्यायला हवा. त्यांच्यासारखा अनुभव व ज्ञान नागरी सेवेतील कर्मचारी अधिका-यांना नसतो.
राहुल गांधी
कॉग्रेसचे (खरेतर सर्वेसर्वा ) राहूल गांधी दीर्घ सुट्टीनंतर त्यांनी केलेले आंदोलन हा केवळ आर्विभावच वाटत आहे. ज्यावेळीस भु-सपांदन करायला होता तेव्हा नॉट रिचेबल असणारे नेते केवळ चमकोगिरी करण्यासाठी आलेले आहेत ही गोष्ट सामान्यांच्या नजरेतून निसटलेली नाही. राहुल गांधी यांनी मुळात देशात समस्या आहेत, याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांना समस्या माहित असत्या तर त्यांची चमकोगिरी उघड झाली नसती.मराठी चित्रपट
मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले पारितोषिक मिळत आहे, ही खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे. पण केवळ कलात्मक चित्रपटाच्या भरवश्यावर लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगणे अव्यावसायीकतेचे लक्षण आहे.कोर्टमधील शाहीर जसा कोर्टात लढतो, तसेच मराठी चित्रपट जनतेच्या दरबारात लढत आहेत. पण लोकाअनुनय करणे जमत नसल्यास जनता तुम्हाला न्याय देत नाही हे कटु सत्य आहे.
शेतकरी
शेतीच्या समस्या व आत्महत्या यावर सतत सामाजिक मंथन नेहमीच चालू असते. मुळात हरीत क्रांतीने शेतक-यांच्या माथ्यावर मारलेली कीटकनाशके आणि हायब्रीड बियाणे यामुळे कसदार उत्पादन हद्दपार झाले आहे.शासनाने सरसकट रासायनीक शेतीवर बंदी घालावी. सामान्य माणसानेही दर्जेदार अन्न खाण्यावर जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बेभरवशामुळे शेती कायम नफ्यात राहणे शक्य नाही. पण मंगळावर जाणारा भारत शेतीत प्रगत तंत्रज्ञान का विकसीत करू शकत नाही?
साहित्य
मराठी भाषेचे पंजाबमधील घुमान येथे नुकताच साहित्य संमेलन पार पडले. यामध्ये देण्यात आलेल्या साहित्यिकांच्या मानधनावरून वाद निर्माण होतो आहे. आपली भाषा आपला बाणा आहे. चांगल्या साहित्यिकांना योग्य मानधन देणे आवश्यक आहे.उगाच सांस्कृतिक दळभद्रेपणा आपला उघडकीस येत आहे. काही चुक झाली असल्यास त्याचा मनःस्ताप समस्त साहित्यिकांना होवू नये. आधीच लेखकांना मिळणारे मानधन खूप काही नसते. त्यापेक्षा आयपीएलमधील चिअरगर्ल्स मिळवीत आहेत. यामुळे साहित्यिकांचा पर्यायाने मराठी भाषेचा मान राखणे आवश्यक आहे.
देशी विचार
भालंचंद्र नेमाडे यांचा देशी विचार खरेच अफलातून आहे. जुनाट सर्दी किंवा तत्सम आजारावर जिंदा तालिस्मात ही रामबाण औषधी आहे , अशी जाहिरात पाहण्यात येते.देशी विचार आत्मसात करा आणि सगळ्याच समस्येवर रामबाण उपाय मिळवा असे म्हणायला कोणाची हरकत नसावी. ( असेल तरी आम्ही देशी बाणा असल्यामुळे फरक पडणार नाही.)देशी विचार म्हणजे मनाचा सच्चेपणा. कुणाला पटो अथवा न पटो दुस-याचे विचार पटत नसल्यास का स्वीकारायचे ? आपल्या विचारांची नाळ आपल्या राज्य , देश, भाषेशी राहिलीच नाही.यामुळे देशी विचार सगळ्याच क्षेत्रात लागू झाले तर कायम असलेले वैचारीक गोंधळ वगैरे संपून एकदिशा तर मिळेल.
No comments:
Post a Comment