भारताचा आज ६९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. लहानपणी आपल्याला १५ ऑगस्ट म्हणजे कडक इस्त्री केलेला युनिफॉर्म घालून कधी झेंडावंदन करतो असे वाटायचे. देश म्हणुन सगळेजण एकटवतात ही गोष्ट रोमांचित करणारी वाटते. सगळ्यात जास्त महत्वाचे नव्या पिढीला उद्याच्या भविष्यासाठी असलेल्या जबाबदारीची नकळत जाणीव होते. आयुष्यभरासाठी मनावर ती कोरली जाण्याचा हा दिवस असतो.
विविधतेने , उच्च मानवी मुल्ये यांचा संस्कार असणारी देशाची परंपरा , विविध भाषा, कला यांनी देश अत्यंत नटलेला आहे. सगळ्यात जास्त म्हणजे त्याग करून देशाच्या विकासात अमुल्य हातभार लावणारा सामान्य माणुस ते विविध थोर व्यक्ती तेजस्वी हि-याप्रमाणे भारतमातेच्या दिव्य अलकांरात शोभतात.
आजच्या स्वांतंत्र्यदिनासाठी लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेक क्रांतीकारांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून चळवळीत भाग घेतला. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण स्वांत्र्य उपभोगु शकतो. याची किंमत अनमोल आहे. स्वांत्र्यदिनामुळेच आपण अभिव्यक्ती, संघटना स्थापन करणे, फिरणे, भाषण करणे अशा विविध स्वातंत्र्य उपभोगतोय. निराशेचे मळभ झटकून टाका.
भारतात असणारी सुप्त शक्ती सगळया जगाला खुणावतेय. त्यासाठी आपण एका सच्चे भारतीय म्हणुन सर्व जबाबदा-या व कर्तव्य पालन करु.
भारत २०२० ला भारत महाशक्ती २०२० होण्यासाठी तयार होवू...... भारतमातेला त्रिवार वंदन...!
========================================================================
भारत २०२० साली महाशक्ती होण्याचे स्वप्न माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पाहिले आहे. तरी आपण यात सहभागी होवू. मराठी पत्रकारीता तुम्हाला सहभागी करत आहे. ब्लॉगवर प्रसिध्दीसाठी आपल्या कल्पना, विचार लेख ईमेलवर पाठवा. shrikantpawar15@gmail.com
No comments:
Post a Comment