शेतक-यांना उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते व किटकनाशके, सुधारीत बियाणे वापरायला शासन व इत्यादींनी प्रोत्साहीत केले. पण याचा काय फायदा झाला ?
भरमसाठ उत्पन्न वाढले. पण भाव खर्चा तुलनेत कधीच मिळाले नाहीत. उलट गुणवत्ता घसरली आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आता कळू लागले आहेत. शेवटी कोणाचा फायदा झाला ?
बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांचे धार्जिणे स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकार मात्र पोकळ विकास दाखवायला मोकळे ! जमीनीचा पोत घसरल्यामुळे नापीक जमीन झाल्यावर दक्षिण आफ्रिकेत शेतक-यांनी शेती करायची का ? त्यालाही शासन अनुदान देईल ? हरितक्रांती ही शेतक-यांची शुध्द फसवणुक आहे.
सरकारने करोडो रूपये अनुदान देण्यापेक्षा सेंद्रिय शेती व त्याला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. मधल्या दलांलाची गरज लागू नये यासाठी थेट ग्राहकापर्यंत माल पोहोचवायला हवा. हॉस्पीटल्सची वाढती संख्या म्हणजे आपल्या देशाचा खुप विकास झाला असा नव्हे. सगळी आरोग्यव्यवस्थाच केमीकलयुक्त अन्नामुळे सलाईनवर आहे.
No comments:
Post a Comment