धर्म नावाचे चलणी नाणे ...
कॉग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात आलटून पालटून सत्तेची खिरापत वाटली जाते. या दोन्ही पक्षासाठी हिंदु व मुस्लीम या भरवश्याच्या व्होटबॅक मजबुत करण्यायासाठी कायम चढाओढ चालू असते. यामुळे कॉग्रेस नेहमी मुस्लीमावर अल्पसंख्याक म्हणुन अन्याय होतो याची ओरड करण्याची संधी सोडत नाही. तर वेळप्रसंगी हिंदुमध्ये न्युनगंड तयार करून वाकुल्या दाखविण्याचे काम करते. तर भाजप विकास नाही पण बोलाचीच कडी व बोलाचाच भात म्हणत केवळ हिंदु धर्माच्या परंपरा गोडवा गाऊन केवळ भ्रमिष्ट करण्याचे काम केले जाते. धर्म हे दोन्ही पक्षाचे चलनी नाणे म्हणुन काम करताना प्रत्यक्षात विकास हे खरे नाणे बनावट होत चालले आहे. दोन्ही पक्षांना हिंदु व मुस्लीम धर्मात दरी असणे सोयीस्कर व हितावह वाटते. त्यामुळे एकसंध भारताला तुकड्यात पाडणारे हे पक्ष किती रसातळाला नेणार आहेत याची कल्पनाच केलेली बरी ! सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता याविषयी आमचे स्पष्ट मत आहे की जगामध्ये एकच धर्म सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात श्रेष्ठ अशा कोणत्याही विचाराशी समतुल्य असा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे .
जेव्हा रूग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा कोणी रक्तदाता कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही.
No comments:
Post a Comment