Wednesday, November 18, 2015

राज ठाकरे यांचे चूकलेच...

                 

मुबंइ महापौर निवासस्थानाजवळ शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा पुतळा उभा केला जात असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जी आखडपाखड केली आहे, त्यामुळे मराठी माणसात साधी एकजूट नसल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.हे सिध्द करण्यातही राज ठाकरेंना राजकारण दिसत असेल तर यासारखे दुसरे मराठी माणसाचे कोणते दुर्दैव असेल ? भाजप व शिवसेनेमधून सध्या विस्तवही जात नाही , पण भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध पुतळ्याला विरोध केला तर नाहीच उलट शिवसेनेच्या नेत्यासोबत जाहीर पत्रपरिषद घेवून स्पष्ट अनुकुलता दाखविली आहे. प्रथमच मराठी माणसाच्या स्वाभामिमानासाठी प्रेरणा देणा-या आणि अत्यंत आक्रमपणामुळे मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणा-या बाळासाहेबांचे स्मारक उभा करण्यातील प्रकरणातून घरातीलच भाऊबंदकीचा शाप सामान्य मराठी माणुस ते  प्रतिष्ठीत व्यक्तींना  चुकला नाही. खरे तर आपण आपलेच पाय किती दिवस ओढण्यासाठी  ओळखले जाणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचे स्मारकाचा विषय शिवसेना फायद्याच्या राजकारणासाठी करणार असली किंवा महापौर निवासस्थानाचा डोळा आहे म्हणून पुतळ्याला विरोध करणे म्हणजे पायाला वेदना होतात म्हणून कापून काढण्यासारखे आहे. काहीवेळेस राजकीय व्यक्तींनी राजकीय हेवेदावे सोडून प्रगल्भपणा दाखवणे अपेक्षीत आहे. पण कधी कधी याचा विसर पडला तर राजकीय पांघरूण किती मळकट हे दिसून येते.
राज ठाकरे यांनी मुंबईतील बिल्डरलॉबी आणि शिवसेना यामधील लागेबांध्यावरील टीका योग्य केली आहे. स्मारकाला पर्यायी जागा उपलब्ध होत असल्याने मुंबईतील शासकीय जागांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पण यासाठी पुतळ्याला विरोध इंजीनाचे टायमींग चुकल्याचे दिसून येते.

राज ठाकरे यांनी सध्या फक्त विरोध आणि विरोधाचेच विषय मांडायला सुरूवात केली आहे. कोणत्याही पक्षप्रमुख प्रचंड त्याग आणि सकारात्मक विचार समाजाला देवूनच समाजाला विकासासाठी नवप्रेरणा, नवशक्ती देण्याची भूमिका स्वीकारावी लागते. याबाबतीत त्यांनी कसलेही धोरण, विचार न करता मांडण्यात येणारे उथळ वक्तव्ये ही भरकटलेली आहेत. शेजारील बिहारी लोकांचे लोंढे जसे पाहिले तसे नितीशकुमारांची कार्यपध्दती पहायला हवी.
परप्रांतीय जरी मेहनती असले तरी मराठी माणसाचा सरळपणा आणि बंधुभावाचा अधिक गैरफायदा घेतात. त्यांच्यामध्ये असणारी एकता ही त्यांच्या विकासासाठी पोषक असते. परंतू मराठीमाणसाने मी पणा सोडावा आणि एकतेसाठी प्रयत्न करावा. मनसे आणि शिवसेनेचे एकीकरण होवो अथवा न होवो पण मराठी माणुस म्हणुन अस्मितेचा विषय येतो तेव्हा एकी हवीच, यामुळे राज ठाकरे हे चुकलेले आहेत असेच म्हणावे लागेल..
पत्रकारितेचा वसा हाती घेतला असून  मराठी हित असेल तिथे आम्ही असेच ठासून बिनधास्त ठासून मत मांडणार आहोत...!

Saturday, November 14, 2015

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !

पुरस्कार परत करणारे साहित्यिक आणि बुध्दिवादी राजकारण .....
साहित्य,  चित्रपट म्हणजे नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या स्वप्नांना, इच्छांचे प्रतिनिधीत्वच या कला करतात. यामुळे साहित्यिक व कलाकाराच्या कलेतून व्यक्त केलेले विचार एकप्रकारे 
लोकांच्या जीवनाशी बांधलेले असतात. पण हे विचार खरेच सामान्य जीवन किती मांडतात याबद्दल न बोललेले बरे ! अपवाद तुरळक आहेत.
राजसत्तेच्या आश्रयाखाली राहून पुरस्कार पदरात पाडून घेणारा कलावंताचा बुध्दीनिष्ठ म्हणुन दिखावा करणारा वर्ग आहे. दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करण्यासाठी साहित्यिकांची चाललेली स्पर्धा हेच त्याचे द्योतक आहे.  मुळात एखादा फोटोसेशन कार्यक्रम असावा आणि यामध्ये आपण मागे पडू नये यासाठी आपण मागे पडू नये असाच मान्यवरांचा प्रयत्न होता.  नाहीतर आणीबाणी असो की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला करणारे सायबर कायदा अशावेळी हे मौनात का होते ?  सत्ता बदलली की पुरस्कार देताना साहित्यिक , कलावंत कोणत्या विचारसरणीशी निगडीत आहे हेच पाहिले जाते.  यामुळे भाजप व कॉग्रेसचे राजकारण हे बुध्दीवादीसमाजामध्ये दुही पसरवण्यासाठीच आहे.  पुरस्कार वापर करून सहिष्णुतेचे पाईक आहोत हे सिध्द करण्यासाठी कला पुरेसे माध्यम आहे.
राजकारण्याच्या आखाड्यात उतरून त्यांनी स्वतः ची बभ्रा करू नये व पर्यायाने वाचक व रसिकांनाही कोड्यात टाकू नये. 

ब्रिटनचा दौरा की पर्यटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशाचे दौरे करत असल्यामुळे भारतात सध्या मोदी कितीदिवस भारतात असणार आहेत. यावर मटकाबुकी जुगार लावतील. मुळात भारतात प्रशासनावर असलेला पगडा किती दिखाऊ आहे हे याचा प्रत्यय सामान्य भारतीय नागरीक घेत असतात. ब्रिट्नच्या दौ-यामुळे मात्र रशियासारखा मित्र देश चीनकडे झुकत असताना रशियाला एकप्रकारे इशाराच मानावा लागेल. ब्रिटन हा उदारमतवादी देश आपला मित्र राष्ट्र असला तरा साहेबाच्या थाटात राहण्याचे दिवस गेले. यामुळेच आम्हाला उपकार नको बरोबरीची वागणूक द्या हे ठणकावून जगाला सांगितले हे खूप चांगले आहे. सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर ब्रिटनने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारतात सुध्दा पर्यायी सक्षम विद्यापीठ उभा राहतील आणि ब्रिटनच्याच विद्यार्थ्यांना भारतात व्हिसासाठी यावे लागेल. किमान आपण अशी अपेक्षा करू या.....


दहशतवाद हा व्हायरसच !
फ्रान्समध्ये आज दहशतवादी हल्ला झाला. याचा अर्थ आपल्या मानवतेवरील धोका अजून टळलेला नाही.   मानवतेमध्ये परस्परामध्ये द्वेषाची भावना वाढविण्यासाठी भीती-दहशत तयार वरून दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढावा यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. यांना केवळ माणसात आपण जन्मण्यासाठी पात्र नाही आहोत हेच विधात्याला सांगायचे असते हे सांगण्यासाठी क्रुरकर्म करण्यासाठी हिंसेच्या कोणत्याही थराला जातात. या व्हायरसवर देशाच्या धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीची अभेद्य बांधणे जरूरु आहे. वसुधैव कुटुब्मकम हेच ते नाते.
सर्व फ्रान्सच्या म्रुत नागरिकांना मराठी पत्रकारितेकडून श्रध्दांजली ! 

Sunday, November 1, 2015

धर्म नावाचे चलणी नाणे ...

धर्म नावाचे चलणी नाणे ...
कॉग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात आलटून पालटून सत्तेची खिरापत वाटली जाते. या दोन्ही पक्षासाठी हिंदु व मुस्लीम या भरवश्याच्या व्होटबॅक मजबुत करण्यायासाठी कायम चढाओढ चालू असते. यामुळे कॉग्रेस नेहमी मुस्लीमावर अल्पसंख्याक म्हणुन अन्याय होतो याची ओरड करण्याची संधी सोडत नाही. तर वेळप्रसंगी हिंदुमध्ये न्युनगंड तयार करून वाकुल्या दाखविण्याचे काम करते. तर भाजप विकास नाही पण बोलाचीच कडी व बोलाचाच भात म्हणत केवळ हिंदु धर्माच्या परंपरा गोडवा गाऊन केवळ भ्रमिष्ट करण्याचे काम केले जाते. धर्म हे दोन्ही पक्षाचे चलनी नाणे म्हणुन काम करताना प्रत्यक्षात विकास हे खरे नाणे बनावट होत चालले आहे. दोन्ही पक्षांना हिंदु व मुस्लीम धर्मात दरी असणे सोयीस्कर व हितावह वाटते. त्यामुळे एकसंध भारताला तुकड्यात पाडणारे हे पक्ष किती रसातळाला नेणार आहेत याची कल्पनाच केलेली बरी ! सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता याविषयी आमचे स्पष्ट मत आहे की जगामध्ये एकच धर्म सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात श्रेष्ठ अशा कोणत्याही विचाराशी समतुल्य असा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे .
जेव्हा रूग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा कोणी रक्तदाता कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही.  

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....