Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Wednesday, April 20, 2016
शनिशिंगणापुर नंतर पुढे काय ?
शनिशिंगणापुर नंतर पुढे काय ?
भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन करून शनिशिंगणापुरच्या चौथ-यावर महिलासाठी प्रवेश मिळवून दिला ही स्वागतार्हबाब आहे. परंतू धार्मिक परंपरा बदलत असताना विनम्रतेचा अवलंब झाला असता तर अधिक सकारात्मकतेचे दर्शन सर्वसामान्यांना झाले असते. परंतू यानिमित्ताने धर्मप्रेमी म्हणवणारे परंतू उग्रविचारांच्या लोकांना उगीचच आयते कोलीत देवून काय साध्य झाले कुणास ठाऊक . एक गोष्ट मात्र खरी असे बदल आता मुस्लीम, ख्रिश्चन , जैन अशा सर्वच धर्मात झाले तर या आंदोलनाचा खरा फायदा सर्व समाजाला होवू शकतो.
नेहमीच सर्वसामान्यांची धुळफेक करणारे राजकीय नेते, तर केवळ दलालातीत मग्न असणारे धर्मपंडीत यांनी शनिमंदिराच्या आंदोलनाच्यावेळी ठामपणे भुमिका न घेतल्यामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे. यापुढील काळात सर्वसामान्य लोकांनी धर्म सुधारणेचे बदल आपणहून स्वीकारणे इष्ट राहणार आहे. अन्यथा धर्म ही मुदत संपलेले औषध होईल व ते फेकुन देण्याची वेळ येईल.
मुस्लिम धर्मातील शरीयत कायद्यामुळे महिलांना पोटगी मिळणे सुध्दा कठीण होते. केवळ तलाक तलाक मिळाल्याने फोनवरही घटस्फोट देता येत असेल तर लग्न आहे हा की पोरखेळ ?
कदाचीत जुन्या जमान्यात तेव्हा विचार योग्य असतील परंतु काळाप्रमाणे बदल न केल्यास आपले अमानवी आयुष्य त्या श्रेष्ठ निर्मिकाला तर स्वीकार होईल का?
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...
No comments:
Post a Comment