हौसेला मोल नसतं. लग्न गरिबाच्या घरचं असो की श्रीमंताच्या घरचे लग्न तेव्हा ही हौस जास्तच दिसून येते. सध्या मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या देदिप्यमान लग्नाच्या खर्चाचे व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच आवडीने पाहिले जात आहेत.
श्रीमंतीपुढे भलेभले झुकले!
या लग्नात वाढपी म्हणून अभिनेता आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचे फोटो पाहून अनेकजण
आश्चर्यचकित झालेत. पैशाच्या मोहमायेपुढे भलेभले लोटांगण घालतात दुसरं काय? काही वर्षापुर्वी बाॅलिवूड शहेनशहा शाहरुख खान हा लग्नाच्या वरातीत नाचून काहीवेळातच 10 लाख रुपये कमवित होता. मात्र हे काम सोडून दिल्यानंतर बर्याच दिवसांनी मुकेश अंबानींसाठी शाहरुख लग्नात नाचला. या सेलिब्रिटींनी फुकटात लगीनघरी सेवा दिली असेल असे म्हणणे बालिशपणाचे ठरेल. कोट्यवधी मोजूनही गानकोकिळा लता मंगेशकर या वयोमानामुळे सिनेमात गाणे गात नाहीत. त्यांनी लग्नासाठी गायत्रीमंत्र आदी रेकाॅर्ड करुन अंबानी परिवारावर कृपा केली.
अंबानी परिवाराने खरी श्रीमंती दाखविली तीअमेरिकन पाॅपस्टारला! ज्या पाॅपस्टारने भारत गरिबांचा देश आहे, म्हटल होत तिला रग्गड पैसे मोजून लग्नाच्या कार्यक्रमात नाचविलं. तिला भारतीयांची आर्थिक श्रीमंती काय असते हे दाखवून दिले.
राफेल, पीकविमा अशा प्रकरणातील घोटाळ्याने अधूनमधून चर्चेत येणारे रिलायन्सचे अनिल अंबानी पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करत होते. त्यांनी माजी राष्ट्रपती, काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जींच स्वागत जीवश्च कंठश्च मित्रासारखे केले. उद्योग आणि राजकारण असे एकमेकांच्या गळ्यात हात घालताना होते. असे असेल तर लोकशाही ही केवळ भांडवलदारांचेच हितरक्षण करेल दुसरे काय करणार?
होऊन जाऊ द्या खर्च ही आर्थिक संस्कृती अशा लग्नाने चांगलीच बहरते. वैयक्तिक खर्च किती करावा हा ज्याचा त्याचा प्रश्र आहे. पण सार्वजनिक जीवनात वावरणा-या व्यक्तींवर मर्यादा येत असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य आणि समाज अधिक विधायक अपेक्षा करतो. कारण त्यांच्या वागणुकीचा संपूर्ण समाजावर परिणाम होत असतो.पण व्यावसायिक नीतिमत्तेचे काय?
अंबानी उद्योगपती असले तरी त्यांचे सत्ताधारी पक्षाबरोबरील साटेलोटे लपून राहिलेले नाही. मुकेश अंबानींनी तेल साठ्याबाबतचे नियम उल्लंघन केल्याने केंद्र सरकारने दंड ठोठावला. हा दंड सरकारच्या नुकसानीच्या तुलनेत कमी असल्याची टीका करण्यात आली होती.
केंद्र सरकारच्याच धोरणामुळे दूरसंचार विभागाच्या मालकीचे असलेले बीएसएनएल आणि एमटीएनएल अखेरची घटका मोजत आहे. दुसरीकडे याचाच लाभ रिलायन्सच्या मालकी कंपनीला व्हावा हा निव्वळ योगायोग नाही.
No comments:
Post a Comment