चीनच्या सीमेवरील कुरापती आणि पाकला देणारी चिथावणी आपल्या देशाला नवी नाही. उलट याला तोंड देणे हे देशाच्या परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची बाब झाली आहे. खरेतर चीनने आपल्या देशातील बाजारपेठेवर एवढा कब्जा घेण्यास सुरुवात केली की आर्थिक गुलामगिरीचे संकट भेडसावत आहे. हे कसे आपण विस्ताराने जाणून घेऊ..
सुरुवातीला कात्री, नेलकटर अशा चीनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. सुरुवातीला वापरा अन् फेका अशा सुमार दर्जाच्या वस्तुंना भारतीयांनी कमी लेखले. पण हळूहळू या उत्पादनांनी मोठी बाजारपेठ काबीज केली, हे कुणालाच कळले नाही. खेळणी ते दिवाळीचे आकाश कंदिल असा चिनी उत्पादनांनी भारतीयांच्या जीवनात शिरकाव केला.
याचा दुष्परिणाम आपल्या उद्योगक्षेत्रावर झाला आहे.
कानपूर हे दर्जेदार चप्पल आणि कुलुपांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या उत्पादनांची जागा स्वस्तातील उत्पादनांनी घेतली. याचा परिणाम म्हणून कानपूर शहराची जुनी ओळख पुसत आहे. अनेक कारागिर बेकार झाले आहेत. जुन्या विणकामगारासह कापड उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांना लपेटून टाकले आहे.
चीनी आक्रमण एवढ्यावरच थांबले नाही. डिजीटल प्रगतीची फळे भारतीयांबरोबर शिओमी, ओप्पो मोबाईल कंपन्या खात आहेत. शिओमीने तर एका दिवसात 1000 दुकाने ग्रामीण भागात सुरू करुन रोजगारावर हात मारायला सुरुवात केली. एवढेच नव्हेतर आगामी काळात चप्पल, कापड उद्योगातही पाय रोवण्याचा निर्णय घेतला आहे. मेक ईन ईंडिया केवळ नावाला असताना हजारो लघु उद्योग बंद पडले आहेत. अशा परिस्थितीला जबाबदार कोण? सरकार, आळशी व्यावसायिक आणि स्वस्ताईला भुलणारा तुम्ही आम्ही ग्राहकवर्ग!!
No comments:
Post a Comment