Saturday, August 11, 2018

सनातन आणि संमोहन

ज्ञानाचा वापर चांगल्या पद्धतीने न केल्यास किती विपरीत घडू शकते याचे चांगले उदाहरण म्हणजे सनातन संस्था. या संघटनेचे मालक संमोहनतज्ज्ञ आहेत. संमोहनाचा वापर व्यक्तीमत्व विकासासाठी होऊ शकतो, हे जगजाहीर आहे. याचा वापर केल्यास माणूस प्रेरीत होऊन अवघडातील अवघड कामे  आत्मविश्वासाने करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सनातनमध्ये संमोहनातून घातक रसायनाचा माणूस घडविण्याचे काम होत आल्याचे दिसून आले आहे. कसे होते हे काम? मुस्लिम दहशतवाद्यांचे जसे ब्रेनवाॕश केले जाते, तसेच ब्रेनवाॕश सनातनमध्ये केले जाते. कधी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे कोण ठरविणार? जर  आपला मेंदू दुसरा नियंत्रित करणार असेल तर त्यासारखा दुर्बलपणा नाही. स्वामी विवेकानंद यांनी सामर्थ्य हेच जीवन तर दुर्बलता म्हणजे मृत्यू म्हटले होते. मग हिंदू जनजागृतीच्या नावाखाली सनातनला नेमके काय साध्य करायचे आहे? जर कोणी जहाल हिंदुत्ववादी याला समर्थन देत असेल तर त्याने पाकिस्तानकडे पहावे. धर्मांधता हा व्यवस्थेला नाशाकडे  नेणारा आहे. 

*बुद्धीची पाटी कोरी नको
आपली श्रद्धास्थाने नष्ट करणे आणि त्यांचे खरे विचार समाजासमोर येऊ नये, हा त्यांचा उद्देश्य असतो.  असे  केले की आपल्या डोक्यात हवे तसे ते घालू शकतात. कारण तुमच्या बुद्धीची पाटी कोरी असते. म्हणून तर शिवाजी खरा कोण होता हे सांगणार्या पानसरेंना संपविले जाते. विज्ञानाधिष्ठीत समाज आन् तर्कसंगत विचार करायला शिकविणे यात आयुष्य व्यतीत करणार्या नरेंद्र् दाभोलकरांना भरदिवसा संपविले. परखड लिहिणार्या गौरी लंकेश यांनाही संपवून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दहशतवादी संघटनांना स्वतंत्र विचार करणारी पिढी नको आहे. त्यासाठी त्यांचा आटापिटा आहे.

*स्वतंत्र विचारसरणी  हवी
आपण स्वतंत्र विचार करायला शिकायला हवे. मेंढरासारख सगळे जग करतय म्हणून आपण तसेच करावे याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीचे कारण समजून घेतले पाहिजे. धर्माच्या नावाखाली कोणालाही वापर करू देऊ नये.

Wednesday, August 8, 2018

बलात्कार आणि माणूस नावाची जात.

न्यायदेवतेच्या मंदिरात जाण्याआधीच तिला मानसिक रुग्ण ठरवून तिचा बळी घेण्यात आला. ३ प्राध्यापक डाॕक्टरांनी मेडीकल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. ती थोडीच मुकी शेळी होती ? येथवर थोडेच थांबणार होते.

न्याय मागण्याचीही तिला किंमत मोजावी लागली. तिला प्रात्याक्षिक परीक्षेत नापास करण्यात आले. न्याय तर मिळालाच नाही. उलट बलात्कार प्रकरणाची चौकशी करणार्या चांडाळचौकडीनेही तिला आणखीनच उद्ववस्त केले. ज्या हातांनी रुग्णसेवेचे व्रत घेण्याचे स्वप्न पाहिले, त्याच हातांनी गळफास घेत तिने आपले आयुष्य  संपविले. तिचे हात थरथरले नसतील का? धनदांडग्यापुढे तिचा आवाज एवढा क्षीण झाला होता का तिने कायमचीच वाचा  बंद करुन घेण्याचा निर्णय घेतला. खरतर बलात्कार करणार्या या नराधमांचा माणसांचा दर्जा काढून घ्यायला हवा. त्यांना हिंस्त्र प्राण्यांच्या कळपात सोडून जाणीवा करुन द्यायला हवी.
कधीतरी माणसाने आपली माणूसपणाची जातही तपाली पाहिजे.

जाता जाता ः देवी फोटोतच आहे, प्रत्यक्षात दिसली  असती तर माणसाने कदाचित बलात्कारी गुण दाखविले असते. ही सोशल मीडियातील पोस्ट थेट स्त्रिया  किती असुरक्षित आणि माणूस किती खालच्या स्थराला जातोय हे सांगते . 

Tuesday, August 7, 2018

गरिबीने चिपाड होणारी माणसं

रस्त्यावर एक गाडा आहे.नेहमीसारखीच तिथं वर्दळ आहे. मच्छी फक्त ३०,४० अन् ५० रुपयांना आहे. खरेतर हा दर कुणालाही परवडणारा आहे. नवरा बायको अन त्यांची लेकरे दोघांजवळ आहेत. भिरभिरणार्या नजरेने त्या गाड्यावरील पदार्थ पाहणारी कदाचित त्याची मेहुणीही आहे. दोन्ही लेकरांच्या डोळ्यातील भुकेचा उसळलेला डोंब लपू शकत नाही. तो घासाघीस करत राहतो. त्याला २० रुपयात मच्छी हवी आहे. पण गाडेवाल्याच म्हणण २रुपये मिळतात. त्यातही घासाघीस परवडत नाही. हे ऐकून दोघींच्याही चेहर्यावर दिसणारी दुर्बलता. याचे उत्तर आरबीयच्या रेपोकडे नाही की जागतिक बँकेने भारताच्या विकासाच्या आकडेवारीत. गाडेवाल्याच लक्ष फक्त आता मच्छी तळण्याकडे आहे. मलातर सगळे विकासाचे अहवाल कढईत गेलेले दिसू लागतात. तेवढ्यात एक कुत्र काहीतरी खाण्याच्या उद्देशाने येते. गिर्हाईक त्याला हाकलून देण्यासाठी किरकाळतात.मग कुत्रा कसबस निघत. तिकडे हा माणूसही निघतो. मध्येच गाडेवाला पोर्याला ओरडतो. कामे नीट कर म्हणून. तो केवळ हाडाचा सापळा झालेला. घागर उचलताना स्पष्ट दिसत. गरिबीमुळे चिपाड झालेल्या  शरीरात अवसान पुन्हा भुकेनेच आणलेले असते. भुकेला भारत रात्रीच्या अंधारात मिस्टर इंडियासारखा गायब होत जातो.

Sunday, January 21, 2018

रोजच्या घडोमोडींचा चेहरा कसा आहे?



ओरिसाच्या कोणार्क मंदिरात सुर्याचे अप्रतिम शिल्प आहेत, म्हणे. सकाळचा सुर्य, दुपारचा सुर्य आणि सायंकाळचा सुर्य असताना सुर्यदेवतेच्या चेहऱ्यावर कसे भाव दिसतात, हे कल्पकतेने रेखाटले आहे. सांगायचा असा विषय आहे, की रोजच्या घडामोंडीना जर मानवी चेहरा असेल तर तो कसा चेहरा असेल? याचा विचार केला तर नक्कीच धक्कादायक निष्कर्ष हाती येतात. 
सेलिब्रिटींचा चेहरा घातलेल्या या घडामोंडींना
शेतकऱ्यांच्या समस्या असो की नागरी समस्यांच्या वेदना आहेत. त्यातही गुन्हेगारींच्या विळख्यातून कितीदा चाकूने भोसकले जाते किंवा अत्याचार केले जातात याला सीमा नाही. तरीही इस्त्राईलचे पंतप्रधानांची भेट असो की आणखी काही सतत उत्सवांचा भडिमार यातून सुंदर पोषाख चढविले जातात. तरीही जातीभेद असो की गरीबी-श्रीमंतीची रोग झाकले जात नाहीत. कुठे तरी अशा बिनचेहऱ्याच्या दिवसाबरोबर प्रवास सुरू असतो. तेव्हा आपण नक्कीच कुठे नक्की जात असतो.  

मुळात राजकीय पक्ष असो की नेते यांचा नेहमीच एक अजेंडा आहे. फुटकळ अथवा प्रसिध्दीचा हव्यास धरून विधाने करून राळ उडवायची. याने काय होते, तरी मुख्य समस्या बाजूला राहतात, अन् भलत्याच विषयांचीत चर्चा होते. उदा. राज्य मनुष्यबळ मंत्री उर्फ ब्रेनवाश खात्याचे सत्यपाल सिंह यांनी डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देणारे भाष्य केले. दहशतवाद या विषयावर सखोल अभ्यास करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याने काय साध्य केले. अभ्यासक्रमात वैज्ञानिक विचारसरणीचा पाया उद्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र अशा विधानामुळे सर्वसामान्यांना चांगल्या शिक्षणाची भीक नको, पण कुत्रे आवर म्हणायची वेळ आली आहे.

To be continued
Shrikant Pawar

Thursday, March 16, 2017

स्त्रीशक्ती हवी की मातृशक्ती

वाचायला थोडे  वेगळे वाटत असेल की पण स्त्रीशक्ती व माता शक्ती  यात कमालीचा फरक आहे. हे आपल्या सहजासहजी  लक्षात येत नाही. सनी लिओन, पुनम पाडे  या महिलानी त्यांच्या अस्तीत्वासाठी ज्या पध्दतीने शरीराचा वापर केला आहे त्यामुळे कोणाचीही मान शरमेने झुकावी अशीच स्थिती आहे. याउलट कठीण परिस्थीत यश मिळविता येते हे यांच्या  खिजगणतीतही नसते. शरीराचा बाजार करणाऱ्या याना केवळ आबट शौकीनाचा सहारा आहे. याला कलेचे पाघरूण घातले की भल्याभल्याची फसगत होते. सगळ्यात नुकसान कोणाचे होत असेल तर मातृशक्तीचे.यावरचा विश्वास उडाला की समजावे समाज रसातळाला चालला ..परकीय  लोकांनी  ज्या पध्दतीने अश्लील वेबसाईटसा उच्छाद माडला आहे. त्याचे मुख्य  कारण येथील समाज व्यवस्था  उध्वस्त करणे आहे.  मिसाईल हल्ला  फक्त  बाहेर दिसतो .पण आतून पोखरणारा हल्ला परतवून लावण्यासाठी आपल्याला  मातृशक्ती समाजाची उभारणी करावी लागेल.यावेळी बरबरटलेली शरीराचा बाजार करणाऱ्या महिलाना यात स्थान  नसावे.

Tuesday, January 31, 2017

ई-बुक आणि मराठी साहित्य


इंटरनेटच्या जमान्यात आता मराठी वाचनाची भुक असणारा खास वाचकवर्ग तयार
झाला आहे.परदेशात स्थायीक झालेला मराठी माणुसऑनलाईन पुस्तके खरेदी करून वाचन करत असल्यामुळे अनेक मान्यवर प्रकाशकांनीबहुतेक पुस्तके वेबसाईटवर ई-बुकच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिलीआहेत.परंतु कोणताही व्यवसायीक हेतु न ठेवता केवळ मराठी साहित्याची सेवाकरण्याचा वसा साहित्यचिंतनने जपलेला आहे.त्यामुळे येत्या काळात लेखक-वाचक-प्रकाशक यामध्ये साधणारा महत्वाचा दुवाम्हणुन साहित्यचिंतन हे संकेतस्थळ काम करेल असा आत्मविश्वासते व्यक्त करतात.आजच्या या डिजीटल दुनियेत जग हे फार जवळ आल आहे. बातम्या, माहिती,पुस्तक, साहित्य क्षणात जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातपोह्चते. मग मराठी साहित्य का पोहचू नये? याच प्रश्नावरून सुरुवात झालीसाहित्य चिंतन या उपक्रमाची http://www.SahityaChintan.com.  पुस्तकाचंमनन, चिंतन आणि भारतीय साहित्य जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने उभीराहिलेली एक चळवळ. साहित्य चिंतन वर मराठी, हिंदी, इंग्रजी भारतीयसाहित्य, साहित्य प्रेमी मित्रांना वाचायला मिळावे व जगात कुठेही ते मोफतउपलब्ध व्हावे हेच साहित्य चिंतन चे मुख्य ध्येय असल्याचे साहित्यचिंतनचेचेतनकुमार  अकर्ते  यांनी सांगितले.

मराठी साहित्य जगभर पोहोचविण्याची तळमळ साहित्य चिंतनची आहे. आजकालचंमराठी साहित्य हे केवळ वह्यापुस्तकांमध्येच अडकून न पडता संगणक, मोबाईलआणि इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोचलंय. साहित्यचिंतन गेल्या ३ वर्ष्या पासून भारतीय साहित्याचे संगणकीकरण करतेय.कादंबरी, कथा, कविता, लेख, साप्ताहिक, मासिक इत्यादी साहित्य मोबाईलवरवाचता यावे म्हणून साहित्य चिंतनने मराठी बुक रीडर तसेच मराठी मोबाईलई-बुक अप्लिकेशन अन्द्रोइडसाठी उपलब्ध केलेय. आज श्यामची आईहे मराठीअन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन ५०००० हजार मोबाईलवर तर चाणक्य नीती आणिश्रीमद भगवत गीता हे हिंदी अन्द्रोइड ई-बुक अप्लिकेशन अनुक्रमे १७५००० व१०००० मोबाईलवरती डाउनलोड करण्यात आले आहेत. अवघे भारतीय साहित्य विश्वआता ‘अन्द्रोइड’ तंत्रज्ञानाच्या मोबाईलवर सामावले जाण्याची शक्यतानिर्माण झाली आहे. साने गुरूजी, वि. दा. सावरकर, तुकाराम महाराज, समर्थरामदास यांचे संतसाहित्य, महात्मा फुले यांच्या साहित्यासह ऐतिहासिक कथा,कादंबऱ्या, कविता असे सर्वकाही वाचकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सर्वच साहित्य मोफत उपलब्ध करणे कॉपीराईट बंधनामुळे शक्य नाही. त्यासाठीमराठी प्रकाशकांनी, मराठी वाचकांच्या सेवेसाठी, नवीन तंत्रज्ञानाची पूर्णमाहिती घेऊन, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करावी. पुस्तक प्रकाशकांनातंत्रज्ञानाची मदत करणे; भारतीय साहित्याचे संगणकीकरण करणे; 'ई-बुक रीडर'तयार करून त्या माध्यमातून संगणक, मोबाईल यासारख्या डिव्हायसेसवरवाचण्यासाठी साहित्य उपलब्ध करणे हे साहित्य चिंतन कार्यरत आहे.

लेखकाच्या प्रतिभासामर्थ्यातुन निर्माण झालेले साहित्य थेट वाचकापर्यंतपोहोचविण्यासाठी लेखकाला चांगलेच दिव्य करावे लागतात.हा त्रास एवढा असतो की याला प्रसववेदनाच म्हटले जाते.त्यामुळे अनेकनवोदीत लेखकांचे साहित्य वाचकापर्यंत हव्या तेवढ्या प्रमाणात येतनाहीय.त्यामुळे मराठी साहित्याचा बोन्साय होत चालला आहे की काय अशी भीतीनिर्माण झाली आहे.हल्लीची पिढी वाचत नाही अशी टीका सर्वसाधारण केलीजातेय.बहुतेक प्रकाशकांनी नवोदीत लेखकांचे साहित्य बहुतेक  प्रसिध्दकरण्यासाठी वेटिंगवर  ठेवलेले असते.त्यामुळे मराठीत नवे विचारांचे , चाकोरीबाह्य लेखनाचे प्रवाह हवे तेवढेखळखळुन वाहत नाहीत.अर्थात त्याचा परिणाम त्यामुळे वाचकवर्गावरही झाल्यानेआजही वाचक जुन्या लेखकांच्या पुस्तकावर आपली वाचनभुक भागवत आहे.ही कोंडी फोडायची कशी हा प्रश्न निर्माण झाली आहे.पण त्याला सोल्युशन आहे का ?

प्रत्यक्षात मात्र मराठीत युवावर्ग आता ऑनलाईन वाचनाकडे चांगलाच आकर्षितझाला असल्याचे चित्र आहे.

मराठी साहित्याचे अभिसरण होण्यासाठी संगणीकरण अर्थात ई-बुकमध्ये रूपांतरणकरणे योग्य ठरणार आहे.वाचकवर्गाला सतत वाटत असत की चांगले साहित्य का वाचायला मिळत नाही?

साहित्य चिंतनच्या ई-बुक रीडरवर पुस्तक वाचणे म्हणजे खरोखरच आल्हादायकअसाच अनुभव आहे.ह्याचा वापर करून माऊसच्या क्लीकवर किंवा मोबाईलवर पुस्तकखर्‍या पुस्तकासारखे वाचु शकता.उदा.पुस्तकाचे पाने उलटणे आणि अक्षरांचाआकार मोठा करून वाचने .वाचन अगदी सहजशक्य करणे शक्य असल्याने वाचक याअप्लीकेशनच्या प्रेमातच पडतो.विशेष म्हणजे साहित्यचिंतनने लेखकांना जितके डाऊनलोड केले जातात त्यापोटीठरावीक मोबदला थेट लेखकांना दिला आहे.त्यामुळे आपले साहित्य मोफत उपलब्धकरून दिल्यामुळे लेखकांचा फायदा होतो आणि वाचकांनाही मोफत वाचायला मिळते.काळाजी पाऊले ओळखत आता सर्वांनीच या लेखक,वाचक प्रकाशक यांनी या नव्यामाध्यमाची ओळख करून घेणे अत्यावश्यक झाले आहे.


असा वळतोय वाचकवर्गवाचन करणे म्हणजे वाचकाला तशी बैठक असावी लागते.म्हणजे फेसबुकसारखेअपडेटस नुसते पाहणे नव्हे.पुस्तकाच्या भावविश्वात प्रवेश करताना बाकीच्याजगाचा विसर पाडत तल्लीन होउन वाचावे लागते.काहीजण एका बैठकीत पुस्तकसंपविणारे आहेत.त्यामुळे साहित्याचा वाचकवर्ग काहीशा प्रमाणात कमी झालाहोता.परंतु परिस्थीती वेगाने बदलत आहे.सतत संगणक आणि मोबाईल्सचा वापर वाढत असल्याने अनेकजण परत वाचनाकडे वळुलागले आहेत.त्यांना पुस्तकाची हार्डकॉपीपेक्षा सॉफ्टकॉपीवाचणे सोयीस्कर वाटु लागले आहे.

लेखकांनी त्यांचे पुस्तक केवळ ई-मेलवर पाठविले की पुस्तक आठवडाभरातपुस्तक प्रकाशीत होते.साहित्यचिंतने लेखकापुढे पुस्तक विक्रीसाठी पन्नास टक्के कमिशनने ई-बुकविक्रीस ठेवणे किंवा मोफत प्रकाशीत करणे हे दोन पर्याय ठेवले आहेत.मोफत पुस्तक दिल्यास ते जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचु शकते त्यातुनलेखकाला चांगली प्रसिध्दी मिळु शकते.त्यामुळे आगामी काळात ई-बुक हीसंकल्पना चांगलीच रूजत आहे.

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....