Tuesday, November 22, 2016

छोट्या सवयी एक जादु

स्टीफन यांचे मिनी हॅबीटस हे पुस्तक वाचुन कालच संपविले. त्याचा सारांश. लेखकाने एका पुशअपपासून सुरुवात केली. रोज एक पुशअप. असे करता करता 1600 पुशअप करून चांगले यश मिळविले. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणे चांगले.खुप जास्त एकाचवेळी करण्यापेक्षा थोडे थोडे रोज करणे चांगले. या सवयींचे फायदे अनुभवा. आपण फक्त प्रेरणादायी विचार केल्याने काही होत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती हवी.  छोट्या सवयीचे
एक पाउल नियमीत टाकले की निश्चीतच बदल होतो.

Friday, November 11, 2016

खरा हुशार कोण?

हुशारीच्या व्याख्या प्रत्येकजण आपल्यापरीने करतो. पण नेमके हुशार कोणाला म्हणावे? जो समजुतदार असतो. जो  आपला स्वार्थ साधताना आपल्याबरोबर दुसर्याचा फायदा करून देतो.ज्याला कीचकट गोष्टी साधेपणाने सांगता येतात.

Thursday, November 10, 2016

काळा पैसा आणि भारत

सध्या भारतात 500, 1000 रूपयांच्या नोटांना काळ्या पैशामुळे भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
विशेष म्हणजे या निर्णायाची माहीती कुणालाच नव्हती. खुद्द पंतप्रधान यांनी देशाला संबोधीत केले तेव्हा काळा पैसा बाळगणार्यांना हार्ट अॅटक येण्याच शिल्लक राहील होत. या भाषणात प्रामाणिक नागरीकांना त्रास होणार नाही, मोदींच्या सर्जिकल सट्राइकमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळी घाण निघून जाईल. पाकिस्तान भारतात खोट्या नोटा पसरवून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करत होता. यामुळे चलन फुगवटा तुफान वाढत चालला होता. याला अटकाव कसा व कधी करायचा प्रश्र होता.

सुरुवातीला सरकारने गरीबांची मोफत बॅकेत खाती काढली. नंतर काळा पैसा बाळगणार्यांना अंतीम मुदत दिली. सगळे नियोजनबध्द असूनही कुणाला कानोकान खबर नव्हती.

आता कोट्यवधींची उलाढाल करून कर बुडविणारे व्यापारी, उद्योग यांना नाईलाजाने कर द्यावे लागेल. काळा पैसा ट्रस्ट,एनजीओ मधून बाहेर काढणे शक्य होईल. कारण नोटा बाद होण्याच्या भीतीने एकतर गुन्हा कबुल व्हावे लागेल. नाहीतर नोटा जाळून टाकाव्या लागतील.

ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा ही बालकवीता अशा पध्दतीने
खरी होईल असे वाटले नव्हते. मोदी नमो नमः

Tuesday, November 8, 2016

राजकारण आणि सत्य

चांगल्या माणसांनी राजकारण करायला शिकावे. मुळात आपण राजकारणाकडे नकारात्मकतेने पाहतो. हे चुकीचे आहे

कारण राजकारणाचा मुळात अर्थ लोकांच्या मनावर अधिराज्य करणे. वाईट माणसांनी त्याचा वापर नकारात्मक पध्दतीने केला आहे.आपण बक्षीस दिले पाहीजे. म्हणजे लोकांचे लोभ जपले पाहीजेत.
जे हवे ते दिले पाहीजे. त्याशिवाय हक्क निर्माण होत नाही.
आपल्याला अधीकार प्राप्त होत नाही.वेळ आली तर शिक्षा करता आली पाहीजे.त्याशिवाय धाक निर्माण होत नाही.
अस करताना आक्रमक होउन सत्याचा विजय,महत्व अधोरेखीत करण्यासाठी शाब्दीक खेळ करून नियोजन करायला हवे. कारण असत्याची ताकद फक्त जिभेत असते.
स्वाभिमान निर्माण करून पुढे जाण्यासाठी दिशा दाखविली पाहीजे. राजकारण घर,आॅफीस येथेही आहे. दुबळेपणा सोडा, असत्याला राजकारणाच्या भाषेत लवकर कळते.

Monday, November 7, 2016

सत्यम् तथा साहसमेव जयते

सत्याचा काळच राहीला नाही. सत्यमेव जयते हे सगळ खोट असे म्हणुन
एक मित्र चांगलाच जळफळाट करत होता. दुसरा एकाने
अरे मी खरयाने वागायचे सोडून दिले तेव्हापासून त्रास  कमी झाला. असा अनुभव सांगीतला. सत्याच्या मार्गाने चालणारा त्रास सहन करेल. परंतू विजय त्याचाच असणार आहे. सत्य परेशान होता है लेकीन पराभूत होता नही. समोरचा कितीही असत्याने वागला.तर सत्याची कास सोडू नका. तुम्हाला खूप उर्जा मिळेल. संयम संपला की साहस दाखवा ते सत्याच्या मार्गाने.त्यामुळे केवळ सत्य आहे आणि साहस नाही असे जर असेल तर ते अर्थहीन आहे. कारण संयमपणा सोडल्यामुळेच असत्याकडे तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवापेक्षा अनमोल मिळवा. तेच अंतीम सत्य आहे.

Thursday, November 3, 2016

आयुष्य आहे तरी काय?

रोज सकाळी उठल्यानंतर मनात पहिला मी प्रश्न निर्माण करतो
आयुष्य आहे तरी काय?
केवळ मजेत जगण्याचे निमित्त,छे एक कोडेच आहे.आव्हानाचा सामना करताना ती परीक्षा वाटू लागते. नेमके ज्या क्षणी जसे तुम्हाला वाटत असते तसे तुम्हाला आयुष्य भासत असते. आयुष्य हे काही  मिळविण्यासाठी नाही.तर चांगले निर्माण करण्यासाठी करण्यासाठी झालेले आहे.त्याला चाकोरीत अडकवता येत नाही.दरवेळेस आपले समज गैरसमज खोटे ठरवत ते नव्या रूपात येते.
कॅलिडोस्कोप मुळे माणुस अवकाश पाहू शकतो. तर मायस्कोपमुळे सुक्ष्मनिरिक्षण करू शकतो. पण आयुष्याला असे पाहता आले तर...जरा विचार करा..
मी केवळ थोड्यावेळाने मरणार आहे असा विचार करा. सोबत काय घेवुन जाणार आहे.जाताना या समाजाला काय देवून जाणार आहे.आपल्या जाण्याने कितीजणाला दुःख होणार आहे. आयुष्याच्या परिघाचा विस्तार करताना माणुस स्वःताङला केंद्रबिंदू करू लागला की आयुष्याचा बोन्साय होतो.आयुष्य खुप सुंदर आहे हे मात्र निर्विवाद!

Wednesday, November 2, 2016

राष्ट्रवाद आणि देशप्रेम


सध्या देशात राष्ट्रवाद आणि देशप्रेम याविषयी
चर्चा चालू आहे. राष्ट्रवाद हा युध्दपिपासू ,जहाल होवू शकतो.देशप्रेम मात्र टोकाला जात नाही.
काॅग्रेसचे अजून 100 पिढ्या राज्य करण्याचे
स्वप्न असल्यामुळे
नेते,पक्ष नेहमी यापासून पळत होते. यामुळे पंतप्रधान जेव्हा सीमेवर जावून दिवाळी साजरी करतात तेव्हा सामान्य नागरिकाला हा फरक प्रकर्षाने जाणवतो.
खरेतर सामान्याला प्यादे समजणारे त्याचा निवडणुकीत वजीर झाल्यास चेकमेट होतात.

राजकीय पक्षांनी केवळ मानसशाशास्राचा वापर करून राज्य केले आहे.यामध्ये केवळ स्वःताला दोष देण्याची भावना मनात हळूवारपणे रूजविणे. मग धर्मनिरपेक्षता  असो किंवा देशप्रेम. आपल्यासारख्या सामान्यांनी आपण कोण आहोत हे सिध्द करण्याची गरज नाही.कारण सामान्यामध्ये असामान्यत्च लपलेले असते. जय हिंद!

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....