Tuesday, November 8, 2016

राजकारण आणि सत्य

चांगल्या माणसांनी राजकारण करायला शिकावे. मुळात आपण राजकारणाकडे नकारात्मकतेने पाहतो. हे चुकीचे आहे

कारण राजकारणाचा मुळात अर्थ लोकांच्या मनावर अधिराज्य करणे. वाईट माणसांनी त्याचा वापर नकारात्मक पध्दतीने केला आहे.आपण बक्षीस दिले पाहीजे. म्हणजे लोकांचे लोभ जपले पाहीजेत.
जे हवे ते दिले पाहीजे. त्याशिवाय हक्क निर्माण होत नाही.
आपल्याला अधीकार प्राप्त होत नाही.वेळ आली तर शिक्षा करता आली पाहीजे.त्याशिवाय धाक निर्माण होत नाही.
अस करताना आक्रमक होउन सत्याचा विजय,महत्व अधोरेखीत करण्यासाठी शाब्दीक खेळ करून नियोजन करायला हवे. कारण असत्याची ताकद फक्त जिभेत असते.
स्वाभिमान निर्माण करून पुढे जाण्यासाठी दिशा दाखविली पाहीजे. राजकारण घर,आॅफीस येथेही आहे. दुबळेपणा सोडा, असत्याला राजकारणाच्या भाषेत लवकर कळते.

Monday, November 7, 2016

सत्यम् तथा साहसमेव जयते

सत्याचा काळच राहीला नाही. सत्यमेव जयते हे सगळ खोट असे म्हणुन
एक मित्र चांगलाच जळफळाट करत होता. दुसरा एकाने
अरे मी खरयाने वागायचे सोडून दिले तेव्हापासून त्रास  कमी झाला. असा अनुभव सांगीतला. सत्याच्या मार्गाने चालणारा त्रास सहन करेल. परंतू विजय त्याचाच असणार आहे. सत्य परेशान होता है लेकीन पराभूत होता नही. समोरचा कितीही असत्याने वागला.तर सत्याची कास सोडू नका. तुम्हाला खूप उर्जा मिळेल. संयम संपला की साहस दाखवा ते सत्याच्या मार्गाने.त्यामुळे केवळ सत्य आहे आणि साहस नाही असे जर असेल तर ते अर्थहीन आहे. कारण संयमपणा सोडल्यामुळेच असत्याकडे तुमचा प्रवास सुरू झालेला असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात जीवापेक्षा अनमोल मिळवा. तेच अंतीम सत्य आहे.

Thursday, November 3, 2016

आयुष्य आहे तरी काय?

रोज सकाळी उठल्यानंतर मनात पहिला मी प्रश्न निर्माण करतो
आयुष्य आहे तरी काय?
केवळ मजेत जगण्याचे निमित्त,छे एक कोडेच आहे.आव्हानाचा सामना करताना ती परीक्षा वाटू लागते. नेमके ज्या क्षणी जसे तुम्हाला वाटत असते तसे तुम्हाला आयुष्य भासत असते. आयुष्य हे काही  मिळविण्यासाठी नाही.तर चांगले निर्माण करण्यासाठी करण्यासाठी झालेले आहे.त्याला चाकोरीत अडकवता येत नाही.दरवेळेस आपले समज गैरसमज खोटे ठरवत ते नव्या रूपात येते.
कॅलिडोस्कोप मुळे माणुस अवकाश पाहू शकतो. तर मायस्कोपमुळे सुक्ष्मनिरिक्षण करू शकतो. पण आयुष्याला असे पाहता आले तर...जरा विचार करा..
मी केवळ थोड्यावेळाने मरणार आहे असा विचार करा. सोबत काय घेवुन जाणार आहे.जाताना या समाजाला काय देवून जाणार आहे.आपल्या जाण्याने कितीजणाला दुःख होणार आहे. आयुष्याच्या परिघाचा विस्तार करताना माणुस स्वःताङला केंद्रबिंदू करू लागला की आयुष्याचा बोन्साय होतो.आयुष्य खुप सुंदर आहे हे मात्र निर्विवाद!

Wednesday, November 2, 2016

राष्ट्रवाद आणि देशप्रेम


सध्या देशात राष्ट्रवाद आणि देशप्रेम याविषयी
चर्चा चालू आहे. राष्ट्रवाद हा युध्दपिपासू ,जहाल होवू शकतो.देशप्रेम मात्र टोकाला जात नाही.
काॅग्रेसचे अजून 100 पिढ्या राज्य करण्याचे
स्वप्न असल्यामुळे
नेते,पक्ष नेहमी यापासून पळत होते. यामुळे पंतप्रधान जेव्हा सीमेवर जावून दिवाळी साजरी करतात तेव्हा सामान्य नागरिकाला हा फरक प्रकर्षाने जाणवतो.
खरेतर सामान्याला प्यादे समजणारे त्याचा निवडणुकीत वजीर झाल्यास चेकमेट होतात.

राजकीय पक्षांनी केवळ मानसशाशास्राचा वापर करून राज्य केले आहे.यामध्ये केवळ स्वःताला दोष देण्याची भावना मनात हळूवारपणे रूजविणे. मग धर्मनिरपेक्षता  असो किंवा देशप्रेम. आपल्यासारख्या सामान्यांनी आपण कोण आहोत हे सिध्द करण्याची गरज नाही.कारण सामान्यामध्ये असामान्यत्च लपलेले असते. जय हिंद!

Wednesday, October 26, 2016

दिवाळीच्या शुभेच्छा

डोळ्यात साठवून दिवाळीचा आनंद घेताना बालपणीची दिवाळी हटकुन आठवते.पहाटे वाजणारी थंहूडहूडीत अभंग्यस्नान,फराळाचा सुगंध,फटाके उडविण्याची घाई यामध्ये केवढा आनंद सामावलेला असायचा.
बालपणाच्या आनंदाची ही ओळख प्रत्येकाच्या मनात कायम कोरलेली असते.
लातूरला सध्या दिवाळी पहातोय.दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याने काहीसे सुगीचे दिवस अनुभवयाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे शेतकरीवर्गात  काहीसे सुखाचे वातावरण आहे.
समोर शिवाजी चौकात दहा बारा वर्षाची मुल बॅड वाजवायची कामे मन लावून करत आहे.तर गोलाई बाजारपेठेत चालायला जागा नाही.
प्रत्येकाला दिवाळी आनंदात साजरी करता यावी.
दीपमाला उजळवून, दिव्याच्या आरास करुन, अंधार दूर सारण्याचा सामूहिक प्रयत्न म्हणजे दिवाळी, दिवाळी हा चिंता - विवंचनांची जळमटे झाडून टाकून उमलत्या आनंदाचे आकाशदिवे आकांक्षांच्या आकाशात झगमगत ठेवणारा सण आहे.आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत.
सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे.

Friday, September 16, 2016

Ashtapailu Magzine- दिवाळी अंक

Ashtapilu-Sarjanshil,paripurntekade......


अष्टपैलू या  नाविन्यपुर्ण व वैशिष्टपुर्ण ठरणा-या दिवाळी अंकाविषयी..
उत्तम संवाद हा कोणत्याही कंपनीला, संस्थेला, व्यवसायाला मजबूत करतो. या प्रयत्नांची संजीवनी म्हणजे दिपावलीच्या आनंदमय प्रसंगी होणारे अष्टपैलू हे मासिक !
‘वर्तमानात  आधीपेक्षा अधिक जोमाने एका मोठ्या चित्राला दुसऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने, लवकर व उत्तम प्रकारे प्रसारित करण्याची गरज आहे’.
कार्यातील सजीवता, संपर्क, आणि उर्जेचा एक भाव  असतो त्यामुळेच यशाची उत्तुंग भरारी आपण घेत असतो.
ही गरज ओळखून विविध क्षेत्रातील प्रसिध्द यशस्वी व्यक्तींच्या
मुलाखती प्रसिध्द करणार आहोत.  उद्योजकता, व्यवस्थापन, बुध्दीमत्ता अशा विषयाचा भरगच्च मजकूर असणारा 'अष्टपैलू'  दिवाळी अंक साधारणतः १ ऑक्टोबरला प्रसिध्द केला जाणार आहे. हा बौध्दीक मेजवानीचा अंक महाराष्ट्रभर हजारो चोखंदळ वाचकापर्यंत  पोहोचणार आहे.  देश-विदेशातील वाचकासाठी या अंकाची हार्डकॉपीबरोबर ई- आवृत्ती  उपलबध करून दिली जाणार आहे.
दिपावली हा सण  निराशा, अंधार दूर करून प्रकाशाने आयुष्य तेजोमय करणारा  आहे.  अष्टपैलू मासिक परिवाराकडून आपल्याला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!


जाहीराती व इतर माहितीसाठी संपर्कः
संपादक                                                     
डॉ.डी.एस.अंबेकर             श्रीकांत पवार
8380981100                   
पत्रकारीता (पीएचडी)      वृत्तपत्र व जनसंज्ञापन पदवी 


ऑफीस- निर्मल हाईटस, तिसरा मजला ए विंग, ४०५, नंदी स्टॉप, औसा रोड लातूर

Thursday, June 16, 2016

उडता पंजाब... Udata Panjab

उडता पंजाब...
सामाजिक प्रश्नाला हात घालीत मनोरंजनाची फोडणी टाकून वास्तवाचे चटके देणारे चित्रपट काढणे ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची आजपर्यंतची खासियत राहिलेली आहे. उडता पंजाबवर सेन्सॉरबोर्डाच्या वादग्रस्त निर्णयामुळे  वाद निर्माण झाला.
पण यामुळे खरेतर चित्रपटाचा मुळविषय दुर्लक्षित राहू शकतो. म्हणुन याविषयी थोडेसे  ....
देशाच्या विकासात विशेषतः सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी व सैनिकामध्ये पंजाबमधील तरूण सर्वाधिक संख्येत सहभागी होतात. याशिवाय ख-या अर्थाने पंजाब म्हणजे भारताचे बलदंड बाहूच आहेत. अशा परिस्थितीत एकाकी पंजाब व हरियाणा या राज्यामध्ये ड्र्ग्जमध्ये तरूणाई स्वतःचा नाश करू लागलेली आहे.  हे कसे घडले ?

प्रथम लक्षात घ्यावे लागेल, पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेशी लागून असलेले राज्य असून पंजाबमधील आएएसआएने नेहमीच खलिस्तानसारख्या विषाला खतपाणी घालण्याचे काम केलेले आहे. याच आयएसएने दाऊदशी हातमिळवणी करून त्याचे नेटवर्क वापरून भारतात अतिरेकी कारवाया चालू ठेवल्या आहेत. भारताचे सामर्थ्य लक्षात घेता पाकिस्तान सरळ सरळ लढण्यापेक्षा तरूणाईला पोखरून काढण्यासाठी पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्ज माफियांनी चांगलेच हात पसरविले आहेत. जिथे अमाप  पैसा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही  सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे पंजाब व हरियाणामध्ये ड्रग्जचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. याकडे स्थानिक राजकीय पक्षाचे  दोन्ही राष्ट्रीय पक्षाने सत्तेसाठी लाड केलेले आहेत. यामुळे नाशाकडे जाणारी तरूणाई स्वतःचे आयुष्य कापरासारखे उडवत आहेत, पर्यायाने उडता पंजाबचे भविष्यही अंधातरीच राहिलेले आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत तर कधी पदमश्री , साहित्यिक पुरस्कार किंवा मंडळ, समित्यावर नियुक्ती देवून विषय झाकण्याचे दिवस आता सरलेत. कारण तरूणाईलाही उडत्या पंजाबाची चांगलीच कळू लागली आहे. असे चित्रपट येतात तेव्हा समाधान वाटते. कोणीतरी जिवंत आहे बॉलीवूडमध्ये ज्याला तरूणाईची भाषा कळते व समाजाचे प्रश्न आहे. दिगदर्शक अनुराग कश्यप यांच्या बंडखोरीला सलाम......

Featured Post

मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?

आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....