Marathi news and Articles. विविध विषयावरील मराठी लेख आणि गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या बातम्या तुम्हाला वाचायला मिळतील.
Sunday, January 24, 2016
सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण..
सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युचे गुढ उकलले पण...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे इतिहाससंशोधकांना नेताजींच्या अंतिम दिनांसंदर्भातील गुढ उकलण्यास सहाय्य होईल अशी आशा आहे.
नेताजींसदर्भात उपलब्ध असलेला समग्र सरकारी दस्तावेज डिजिटल स्वरुपात संग्रहित करण्यात आला आहे. हा दस्तावेज खुला करावा अशी मागणी नेताजींचे वारस तसेच सर्वसामान्य भारतीय अनेक काळापासून करत होते.
गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला नेताजींच्या कुटुंबियांनी पंतप्रधानांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी आपल्या वडिलांचा विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची पूर्ण शक्यता आहे; परंतु आणखी काही पुरावे समोर आल्यास आपण खुल्या मनाने हे स्वीकारण्यास तयार आहोत,अशी भावना व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, नेताजींशी संबंधित या फाईल्स सार्वजनिक झाल्याने आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता नाही. याऐवजी भारत सरकारने जपान सरकारच्या मदतीने रिनकोजी मंदिरात ठेवण्यात आलेल्या त्यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करून घ्यावी म्हणजे या संपूर्ण वादावर पडदा पडेल.
१९९७ साली अभिलेखागाराला आझाद हिंद सेनेशी संबंधित ९९० फाईल्स संरक्षण मंत्रालयाकडून मिळाल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये गृहमंत्रालयाने नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या खोसला आयोगाच्या १०३० फाईल्स व दस्तावेज तसेच मुखर्जी आयोगाच्या ७५० फाईल्स आणि दस्तावेज सोपविले होते. हे दस्तावेज यापूर्वीच जाहीर झाले आहेत.फाईल्स सार्वजनिक करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर गृह आणि विदेश मंत्रालयानेही त्यांच्याजवळील फाईल्स सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करून त्या अभिलेखागाराच्या सुपूर्द केल्या होत्या.
सुरुवातीला १०० फाईल्स सार्वजनिक करण्यात येणार असून त्यांचे डिजिटलीकरण केले आहे. या फाईल्स चांगल्या पद्धतीने सांभाळण्यात आल्या असून अभिलेखागाराने दर महिन्याला २५ फाईल्सच्या डिजिटल प्रती लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा मॄत्यु झाला असताना सरकारने याबाबबतची कागदपत्रे आजपर्यंत खुली का केली नव्हती? सुभाषचंद्र बोस हे जर्मनी व रशिया या देशातील राष्ट्रप्रमुखांची भारत स्वतंत्र होण्यासाठी मदत घेत असल्यामुळेच नेहरूंनी जाणिवपुर्वक बोस यांचे कार्य अडगळीत टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक गुमनामीबाबा हेच सुभाषचंद्र बोस आहेत अशी चर्चा सुरू झाल्यापासून सरकारची बदनामी झाली होती.
स्वतः महात्मा गांधी यांनी जवाहरलाल नेहरूपेक्षा बोस यांना पंतप्रधान म्हणुन संधी दिली असती तर पाकिस्तानसारखे देशाला लागलेले दुखणे कदाचीत पहायला मिळले नसते. तसेच अत्यंत बुध्दीमान आणि त्यागी जीवन असणा-या सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान झाले असते तर देशाचे चित्र बरेचसे पालटले असते असा सर्वसाधारणपणे अंदाज केला जातो. जरी ते पंतप्रधान मिळवू शकले नाहीत तरी सर्वसामान्य जनतेच्या ह्रदयात कायम विराजमान आहेत.
सत्याग्रह आणि क्रांती या स्वांत्र्यप्राप्तीच्या दोन मार्गात बोस यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला . पण राजकारणामुळे क्रांतीचा मार्ग आणि त्यासाठी लढणारे वीर यांना कायमच दुय्यम लेखले गेले आहे. सुभाषबाबू अश्या हजारो क्रांतीकारकांचे मुकुटमणीच !
Sunday, January 10, 2016
दहशतवादाला अंतीम उत्तर काय असू शकते ?
लव्ह सिटी पॅरीसवर इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एका नागरिकाची पत्नी मरण पावली. या घटनेनंतर त्या नागरिकांनी आपल्या मुलांचे संगोपन आणि दिनचर्या दुस-या दिवसापासून जशी होती तशीच चालू ठेवली आणि अतिरेक्यांना प्रसिध्दीमाध्यमातून संदेश दिला. तुम्ही माझी प्रिय व्यक्ती हिरावून घेतली. पण माझा तुमच्यावर राग नाही. आजही माझे आयुष्य तुमच्या धाकात नाहीतर माझ्या मर्जीने चालू आहे. स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा जगाला संदेश देणारा फ्रान्स देश किती प्रखर देशभक्त आणि सशक्त आहे हे याचे बोलके उदाहरण होय.
नुकताच पठाणकोट येथील हल्ल्यात निष्पाप नागरिक मरण पावले आहेत. भारतात केवळ पाच-सहा अतिरेकी येतात आणि देशाच्या लोकशाही आणि धर्माच्या नावाखाली एकतेलाच
सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मानवतेला कलंक लावणारे आहे.
मुळात पाकिस्तानबरोबर सलोख्याचे संबंध तयार होताना अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्याचा चेव येण्यामागे मानसशास्त्र काय आहे? कुणीही काहीही म्हणो दहशतवाद हे प्रथम लोकमानसिकतेच्या आधारावरच जास्त खेळले जाते. त्याचे असे आहे की सर्वसामान्यांच्या भावनांना धक्का बसला आणि अस्थिरता, अनिश्चितता निर्माण झाली की दहशतवाद्यांची मोहीम फत्ते होते. जागतीक पातळीवर असणा-या इसिसने भारताविरूध्दही युध्द पुकारले आहे. सगळेच देश दहशतवादाने होरपळून निघत असताना दहशतवादाला अंतीम उत्तर म्हणजे त्यांच्या भीतीला कसलीच भीक न घालणे. हिंदु-मुस्लीममध्ये दरी निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे. दुसरे म्हणजे कधीही आम्ही कुठेही हल्ले करू शकतो हे दाखवून त्यांना आपले सामर्थ्य असल्याचा भ्रम तयार होतो. सध्या इसिसपाठीमागे कोणता देश कोणता विचार आहे यापेक्षा कोणत्या परिस्थितीतून हा दहशतवाद जन्माला आलाय याचा विचार केला तर इसिस काय हे कळू शकते.
तेल इंधनच्या विहिरी आणि युरोपीराष्ट्रांचे युध्द
आसुरी महत्वांकाक्षा आणि धर्माचा बुरखा घातला तर कुत्र्याचाही वाघ होतो हे इसिसने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
१) दहशतवादी तयार होतात. यामागे त्यांचा ब्रेनवॉश केला जातो. अशा पध्दतीचा अभ्यास करून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केला पाहिजे.
२) दहशतवाद हा मुस्लीमविरोधी असून त्याला समर्थन देणा-या विद्वान मौलाना, मुस्लीम विचारवंत आणि सुधारणावादी विचारवंत, महिला यांना प्रोत्साहन द्यायला हवे.
३) दहशतवादाचे तरूणामध्ये आकर्षण असून यामुळे आयुष्य कसे उध्दवस्त होते हे युवकापर्यंत थेट पोहोचवायला हवे.
४) जे युवक अत्यंत क्रियाशील परंतू भावुक आहेत त्यांचा ओढा दहशतवादाकडे असू शकतो अशा सुशिक्षीत तरूणांची शक्ती नवनिर्मीतीकडे वळवायला हवी. उदाहरणार्थ मुस्लीमबांधवात गरीबीमुळे अनेकांना उच्च शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना शिकविण्यासाठी असे युवक चांगले योगदान देवू शकतात.
५) समाजात गुन्हेगारी कडे वळलेला, गरीबीमुळे त्रस्त असा युवकवर्गाला दहशतवाद हे सोपे कमविण्याचे साधन वाटू शकते, अशी वेळच येवू नये म्हणुन शासनाने त्यांना सक्तिने स्वच्छता व तत्सम सेवेस लावून अन्न, वस्त्र द्यायला हवे.
दहशतवादाचा सामान्यावर कसलाच परिणाम होवू न देणे हेच अंतीम उदाहरण आहे.
Saturday, January 2, 2016
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते. पण मला काही मानू या हॉ गोष्ट समजलीच नाही. मी याबद्दल गणिताच्या त्या आदर्श ( ?) शिक्षकांना का मानायचे असा प्रश्न नम्रपणे विचारला. पण सरांचा इगो भलताच दुखावला आणि त्यांनी पाणउतारा केला. खरेतर गणीताचा विषय आवडीचा आहे. पण गणीतासारखा विषय मानू या समजू या पध्दतीने शिकावा लागत असेल तर त्यासारखे दुर्दैव विद्यार्थ्यांचे नाही. बुध्दी गहाण ठेवून का शिकावे
एखादी गोष्ट का शिकत आहोत , त्याचा उपयोग कुठे होणार आहे याची माहिती कधीच दिली जात नाही. परिक्षेत पास होण्यासाठी व अधिक मार्क्स मिळविण्यासाठी परिक्षेचे तंत्र शिकूनच घ्यावे लागते.
सध्याची शिक्षणपध्दतीमधून किती पॅकेज घेणारे युवक व रोजगार निर्माण होतात हीच गोष्ट समाज, पालक व विद्यार्थ्यासाठी महत्वाची आहे. या गोष्टींनाही महत्व आहे. पण विद्यार्थ्यामध्ये असणारी नैसर्गीक बुध्दीमत्ता मारून टाकणारी शिक्षणपध्दत पाहिली की मेकॉलेने रचलेली ही शिक्षणव्यवस्था किती विषारी आहे हे समजते. उदाहरणार्थ मला लिहण्याची आवड असून या शिक्षणव्यवस्थेने सुरूवातीपासूनच संधी दिली असती तर तळमळीने योग्य क्षेत्र निवडले असते. इच्छा असूनही तुम्हाला शिकता येत नाही व इच्छा असूनही शिकता येत नाही ही शिक्षणपध्दती मेकॉलेची ! भारतीय नागरीक
लॉर्ड मेकॉलेने केवळ इंग्रजांची राजवट मजबूत करण्यासाठी केवळ क्लार्क तयार व्हावेत यासाठी जी शिक्षणपध्दत राबविली ती म्हणजे मेकॉले शिक्षणपध्दती. आजही आपण त्याच मेकॉले शिक्षणव्यवस्थेने शिक्षण घेतो. यामध्ये केवळ पाठांतर आणि त्यावर आधारीत परिक्षा यावरच भर असतो. मेकॉले शिक्षणपध्दतीचा सर्वाधिक फटका अत्यंत हूशार विद्यार्थ्यांना अधिक बसतो. बुध्दीमत्तेचे आठप्रकार आहेत. या शिक्षणपध्दतीत उद्योजकता, नेतृत्वगुण, देशप्रेम, आवड्त्या विषयाचे सखोल ज्ञान घेण्याची बालपणापासून मुभा या गोष्टींना का टाळले आहे ?
मेकॉले ही शिक्षणपध्दती आजच्या काळात केवळ धनाढ्य उद्योजक, बडे नेते, राजकीय पक्ष यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण मेंढरासारखी केवळ एकमेकांचे अनुकरण करणारी व बुध्दी गहाण ठेवणारे युवावर्ग त्यांना हवाहवासा आहे. पिढ्यानपिढ्या बुध्दीगहाण ठेवून अशास्त्रीय पध्दतीने घेत असलेले शिक्षण म्हणजे ओझे वाहणे आहे. मेकॉलेची शिक्षणपध्दती किती दिवस समाजाने पचवायची हा प्रश्न खुप गंभीर आहे.
Sunday, December 27, 2015
पंतप्रधान मोदी यांची पाकिस्तानला भेट भारताच्या प्रगल्भतेचे उदाहरण...
२६-११ मुंबईवरील पाकिस्तानच्या अतिरेक्यांचा हल्ला विसरता येत नाही. पण दहशतवादाला विरोध करत असताना आपण काही वेगळ्या मार्गांचा अवलंब करू शकतो का ? याचे उत्तर जेवढे सोपे तेवढे अवघड आहे. Communication is Solution of all problems. जगातील प्रत्येक समस्येवर संवाद हे एकमेव उत्तर आहे. भले त्या संवादाची भाषा संगीताची असेल नाहीतर राजकीय कूटनीतीची !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्याबाबत भिजती घोंगडी झालेल्या अनेक प्रश्नाकडे ठोस उपाय करण्यासंबंधी पाऊले उचलायला सुरूवात केली आहे.भारत म्हणजे मोठी बाजारपेठ , ठोस भूमिका व जागतीकपातळीवरील ठेवलेला उदार, शांततावादी दृष्टीकोन अशी प्रतिमा आहे. जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतानाच त्यांनी अत्यंत सखोलपणे योजनांची अमंलबजावणी व परराष्ट्रनीतीची व्युहरचना आखलेली आहे. विरोधक मोदी हे हूकूमशहा असल्याची टीका करतात. परंतू त्यांच्या ठोस व स्पष्ट निर्णयामुळे नोकरशाहीवरील, पक्षावरील पकड अधिक मजबूत झाल्याकडे कोणताही सर्वसामान्य माणूस डोळेझाक करू शकत नाही. अशाच बाबीमुळे मोदी अनपेक्षित , सकारात्मक निर्णय घेतील असा सर्वसामान्यांना विश्वास वाटू लागला सर्वप्रथम भारतात गुंतवणुकदारांना निमंत्रण देवून सशक्त आर्थिक महासत्ता करण्यासाठी फ्रान्स, रशिया, अमेरिका इत्यादी देशाशी करार केले आहेत. असे असले तरी उठसुठ भारताच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान सतत उगाळत असतो. याला भारताने सकारात्मक आणि संवादपातळीवर प्रयत्न ठेवावेत असा बहुतेक देशांचा आग्रह आहे. अशा परिस्थीतीत नवाजशरीफ यांच्या वाढदिवसदिनी पंतप्रधान मोदींनी थेट त्यांना अचानक भेट देवून चकीत केले. अश्या भेटीचा खरेच फायदा किती व तोटा किती याचा उहापोह करणे आवश्यक आहे. हेच शरीफ म्हणाले होते.धर्म हे अफूची गोळी आहे. तर रोजीरोटी श्वास आहे. पण पंतप्रधान नवाज शरीफ एकदा म्हणाले होते भले गवत खावून दिवस काढू..
मुळात पाकिस्तान हा अतिरेक्यांना पोसणारा देश असून त्यांचे अर्थकारण व जगाला ब्लॅकमेलींग करून अधिकाधिक कर्ज पदरात पाडून घेणारा देश अशी प्रतिमा आहे. पाक अंतर्गत दहशतवाद होरपळून निघत असताना अर्थात सर्वात जास्त बळी ठरतात निष्पाप महिला व लहान मुले. पाकचे लष्करी व राजकीय नेते धार्मिक उन्मादाने जनतेला भ्रमीत करतात आणि भारताविरूध्द गरळ ओकतात. याला खरे उत्तर त्या देशाने भारतासारख्या शेजारी राष्ट्राने शिकून घ्यायला हवे. भारतीय नागरीक हे जगात कोठेही जाओ ते आपलेपणाने सगळ्यांची मने जिंकतात. कारण या मातीनेच त्यांना बाळकडू पाजलेले असते. उलट पाकिस्तानने केवळ असूया व द्वेष यांचे गाठोडे बांधून इतिहासच कलंकित केलेला आहे.
बलाढ्य राष्ट्रे ही व्यापारी राष्ट्रे म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आशियाखंडात भारताचे सामर्थ्य नको असल्यामुळेच पाकिस्तानला खतपाणी घातले जाते. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे किमान पाकिस्तानच्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कारण सर्वसामान्य माणुस कोणत्याही देशातील असो त्याला आपले कुटूंबप्रिय असते. इतरांच्या कुटूंबियाकडेही तो त्याच आत्मतीयतेन पहात असतो, याला पाकिस्तानही अपवाद नसावा. नाना पाटेकरच्या भाषेत सांगायचे झाले तर सबका खून लाल है.
आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला दिलेली भेट हे भारताच्या प्रगल्भतेचे उदाहरण आहे. कारण लोकशाही व वसुधैव कुटूम्बकम अशी देशाची संस्कृती आहे.
Wednesday, November 18, 2015
राज ठाकरे यांचे चूकलेच...
मुबंइ महापौर निवासस्थानाजवळ शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा पुतळा उभा केला जात असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जी आखडपाखड केली आहे, त्यामुळे मराठी माणसात साधी एकजूट नसल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.हे सिध्द करण्यातही राज ठाकरेंना राजकारण दिसत असेल तर यासारखे दुसरे मराठी माणसाचे कोणते दुर्दैव असेल ? भाजप व शिवसेनेमधून सध्या विस्तवही जात नाही , पण भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध पुतळ्याला विरोध केला तर नाहीच उलट शिवसेनेच्या नेत्यासोबत जाहीर पत्रपरिषद घेवून स्पष्ट अनुकुलता दाखविली आहे. प्रथमच मराठी माणसाच्या स्वाभामिमानासाठी प्रेरणा देणा-या आणि अत्यंत आक्रमपणामुळे मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणा-या बाळासाहेबांचे स्मारक उभा करण्यातील प्रकरणातून घरातीलच भाऊबंदकीचा शाप सामान्य मराठी माणुस ते प्रतिष्ठीत व्यक्तींना चुकला नाही. खरे तर आपण आपलेच पाय किती दिवस ओढण्यासाठी ओळखले जाणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांचे स्मारकाचा विषय शिवसेना फायद्याच्या राजकारणासाठी करणार असली किंवा महापौर निवासस्थानाचा डोळा आहे म्हणून पुतळ्याला विरोध करणे म्हणजे पायाला वेदना होतात म्हणून कापून काढण्यासारखे आहे. काहीवेळेस राजकीय व्यक्तींनी राजकीय हेवेदावे सोडून प्रगल्भपणा दाखवणे अपेक्षीत आहे. पण कधी कधी याचा विसर पडला तर राजकीय पांघरूण किती मळकट हे दिसून येते.
राज ठाकरे यांनी मुंबईतील बिल्डरलॉबी आणि शिवसेना यामधील लागेबांध्यावरील टीका योग्य केली आहे. स्मारकाला पर्यायी जागा उपलब्ध होत असल्याने मुंबईतील शासकीय जागांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पण यासाठी पुतळ्याला विरोध इंजीनाचे टायमींग चुकल्याचे दिसून येते.
राज ठाकरे यांनी सध्या फक्त विरोध आणि विरोधाचेच विषय मांडायला सुरूवात केली आहे. कोणत्याही पक्षप्रमुख प्रचंड त्याग आणि सकारात्मक विचार समाजाला देवूनच समाजाला विकासासाठी नवप्रेरणा, नवशक्ती देण्याची भूमिका स्वीकारावी लागते. याबाबतीत त्यांनी कसलेही धोरण, विचार न करता मांडण्यात येणारे उथळ वक्तव्ये ही भरकटलेली आहेत. शेजारील बिहारी लोकांचे लोंढे जसे पाहिले तसे नितीशकुमारांची कार्यपध्दती पहायला हवी.
परप्रांतीय जरी मेहनती असले तरी मराठी माणसाचा सरळपणा आणि बंधुभावाचा अधिक गैरफायदा घेतात. त्यांच्यामध्ये असणारी एकता ही त्यांच्या विकासासाठी पोषक असते. परंतू मराठीमाणसाने मी पणा सोडावा आणि एकतेसाठी प्रयत्न करावा. मनसे आणि शिवसेनेचे एकीकरण होवो अथवा न होवो पण मराठी माणुस म्हणुन अस्मितेचा विषय येतो तेव्हा एकी हवीच, यामुळे राज ठाकरे हे चुकलेले आहेत असेच म्हणावे लागेल..
पत्रकारितेचा वसा हाती घेतला असून मराठी हित असेल तिथे आम्ही असेच ठासून बिनधास्त ठासून मत मांडणार आहोत...!
Saturday, November 14, 2015
दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !
दिपावलीच्या सर्व वाचकांना व त्यांच्या परिवाराला मराठी पत्रकारिता ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा !
पुरस्कार परत करणारे साहित्यिक आणि बुध्दिवादी राजकारण .....
साहित्य, चित्रपट म्हणजे नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या स्वप्नांना, इच्छांचे प्रतिनिधीत्वच या कला करतात. यामुळे साहित्यिक व कलाकाराच्या कलेतून व्यक्त केलेले विचार एकप्रकारे
लोकांच्या जीवनाशी बांधलेले असतात. पण हे विचार खरेच सामान्य जीवन किती मांडतात याबद्दल न बोललेले बरे ! अपवाद तुरळक आहेत.
राजसत्तेच्या आश्रयाखाली राहून पुरस्कार पदरात पाडून घेणारा कलावंताचा बुध्दीनिष्ठ म्हणुन दिखावा करणारा वर्ग आहे. दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करण्यासाठी साहित्यिकांची चाललेली स्पर्धा हेच त्याचे द्योतक आहे. मुळात एखादा फोटोसेशन कार्यक्रम असावा आणि यामध्ये आपण मागे पडू नये यासाठी आपण मागे पडू नये असाच मान्यवरांचा प्रयत्न होता. नाहीतर आणीबाणी असो की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला करणारे सायबर कायदा अशावेळी हे मौनात का होते ? सत्ता बदलली की पुरस्कार देताना साहित्यिक , कलावंत कोणत्या विचारसरणीशी निगडीत आहे हेच पाहिले जाते. यामुळे भाजप व कॉग्रेसचे राजकारण हे बुध्दीवादीसमाजामध्ये दुही पसरवण्यासाठीच आहे. पुरस्कार वापर करून सहिष्णुतेचे पाईक आहोत हे सिध्द करण्यासाठी कला पुरेसे माध्यम आहे.
राजकारण्याच्या आखाड्यात उतरून त्यांनी स्वतः ची बभ्रा करू नये व पर्यायाने वाचक व रसिकांनाही कोड्यात टाकू नये.
ब्रिटनचा दौरा की पर्यटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशाचे दौरे करत असल्यामुळे भारतात सध्या मोदी कितीदिवस भारतात असणार आहेत. यावर मटकाबुकी जुगार लावतील. मुळात भारतात प्रशासनावर असलेला पगडा किती दिखाऊ आहे हे याचा प्रत्यय सामान्य भारतीय नागरीक घेत असतात. ब्रिट्नच्या दौ-यामुळे मात्र रशियासारखा मित्र देश चीनकडे झुकत असताना रशियाला एकप्रकारे इशाराच मानावा लागेल. ब्रिटन हा उदारमतवादी देश आपला मित्र राष्ट्र असला तरा साहेबाच्या थाटात राहण्याचे दिवस गेले. यामुळेच आम्हाला उपकार नको बरोबरीची वागणूक द्या हे ठणकावून जगाला सांगितले हे खूप चांगले आहे. सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर ब्रिटनने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारतात सुध्दा पर्यायी सक्षम विद्यापीठ उभा राहतील आणि ब्रिटनच्याच विद्यार्थ्यांना भारतात व्हिसासाठी यावे लागेल. किमान आपण अशी अपेक्षा करू या.....
दहशतवाद हा व्हायरसच !
फ्रान्समध्ये आज दहशतवादी हल्ला झाला. याचा अर्थ आपल्या मानवतेवरील धोका अजून टळलेला नाही. मानवतेमध्ये परस्परामध्ये द्वेषाची भावना वाढविण्यासाठी भीती-दहशत तयार वरून दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढावा यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. यांना केवळ माणसात आपण जन्मण्यासाठी पात्र नाही आहोत हेच विधात्याला सांगायचे असते हे सांगण्यासाठी क्रुरकर्म करण्यासाठी हिंसेच्या कोणत्याही थराला जातात. या व्हायरसवर देशाच्या धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीची अभेद्य बांधणे जरूरु आहे. वसुधैव कुटुब्मकम हेच ते नाते.
सर्व फ्रान्सच्या म्रुत नागरिकांना मराठी पत्रकारितेकडून श्रध्दांजली !
पुरस्कार परत करणारे साहित्यिक आणि बुध्दिवादी राजकारण .....
साहित्य, चित्रपट म्हणजे नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या स्वप्नांना, इच्छांचे प्रतिनिधीत्वच या कला करतात. यामुळे साहित्यिक व कलाकाराच्या कलेतून व्यक्त केलेले विचार एकप्रकारे
लोकांच्या जीवनाशी बांधलेले असतात. पण हे विचार खरेच सामान्य जीवन किती मांडतात याबद्दल न बोललेले बरे ! अपवाद तुरळक आहेत.
राजसत्तेच्या आश्रयाखाली राहून पुरस्कार पदरात पाडून घेणारा कलावंताचा बुध्दीनिष्ठ म्हणुन दिखावा करणारा वर्ग आहे. दादरी प्रकरणावरून पुरस्कार परत करण्यासाठी साहित्यिकांची चाललेली स्पर्धा हेच त्याचे द्योतक आहे. मुळात एखादा फोटोसेशन कार्यक्रम असावा आणि यामध्ये आपण मागे पडू नये यासाठी आपण मागे पडू नये असाच मान्यवरांचा प्रयत्न होता. नाहीतर आणीबाणी असो की अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला करणारे सायबर कायदा अशावेळी हे मौनात का होते ? सत्ता बदलली की पुरस्कार देताना साहित्यिक , कलावंत कोणत्या विचारसरणीशी निगडीत आहे हेच पाहिले जाते. यामुळे भाजप व कॉग्रेसचे राजकारण हे बुध्दीवादीसमाजामध्ये दुही पसरवण्यासाठीच आहे. पुरस्कार वापर करून सहिष्णुतेचे पाईक आहोत हे सिध्द करण्यासाठी कला पुरेसे माध्यम आहे.
राजकारण्याच्या आखाड्यात उतरून त्यांनी स्वतः ची बभ्रा करू नये व पर्यायाने वाचक व रसिकांनाही कोड्यात टाकू नये.
ब्रिटनचा दौरा की पर्यटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशाचे दौरे करत असल्यामुळे भारतात सध्या मोदी कितीदिवस भारतात असणार आहेत. यावर मटकाबुकी जुगार लावतील. मुळात भारतात प्रशासनावर असलेला पगडा किती दिखाऊ आहे हे याचा प्रत्यय सामान्य भारतीय नागरीक घेत असतात. ब्रिट्नच्या दौ-यामुळे मात्र रशियासारखा मित्र देश चीनकडे झुकत असताना रशियाला एकप्रकारे इशाराच मानावा लागेल. ब्रिटन हा उदारमतवादी देश आपला मित्र राष्ट्र असला तरा साहेबाच्या थाटात राहण्याचे दिवस गेले. यामुळेच आम्हाला उपकार नको बरोबरीची वागणूक द्या हे ठणकावून जगाला सांगितले हे खूप चांगले आहे. सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसावर ब्रिटनने निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारतात सुध्दा पर्यायी सक्षम विद्यापीठ उभा राहतील आणि ब्रिटनच्याच विद्यार्थ्यांना भारतात व्हिसासाठी यावे लागेल. किमान आपण अशी अपेक्षा करू या.....
दहशतवाद हा व्हायरसच !
फ्रान्समध्ये आज दहशतवादी हल्ला झाला. याचा अर्थ आपल्या मानवतेवरील धोका अजून टळलेला नाही. मानवतेमध्ये परस्परामध्ये द्वेषाची भावना वाढविण्यासाठी भीती-दहशत तयार वरून दुर्जन शक्तीचा प्रभाव वाढावा यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. यांना केवळ माणसात आपण जन्मण्यासाठी पात्र नाही आहोत हेच विधात्याला सांगायचे असते हे सांगण्यासाठी क्रुरकर्म करण्यासाठी हिंसेच्या कोणत्याही थराला जातात. या व्हायरसवर देशाच्या धर्माच्या भिंतीपेक्षा माणुसकीची अभेद्य बांधणे जरूरु आहे. वसुधैव कुटुब्मकम हेच ते नाते.
सर्व फ्रान्सच्या म्रुत नागरिकांना मराठी पत्रकारितेकडून श्रध्दांजली !
Sunday, November 1, 2015
धर्म नावाचे चलणी नाणे ...
धर्म नावाचे चलणी नाणे ...
कॉग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षात आलटून पालटून सत्तेची खिरापत वाटली जाते. या दोन्ही पक्षासाठी हिंदु व मुस्लीम या भरवश्याच्या व्होटबॅक मजबुत करण्यायासाठी कायम चढाओढ चालू असते. यामुळे कॉग्रेस नेहमी मुस्लीमावर अल्पसंख्याक म्हणुन अन्याय होतो याची ओरड करण्याची संधी सोडत नाही. तर वेळप्रसंगी हिंदुमध्ये न्युनगंड तयार करून वाकुल्या दाखविण्याचे काम करते. तर भाजप विकास नाही पण बोलाचीच कडी व बोलाचाच भात म्हणत केवळ हिंदु धर्माच्या परंपरा गोडवा गाऊन केवळ भ्रमिष्ट करण्याचे काम केले जाते. धर्म हे दोन्ही पक्षाचे चलनी नाणे म्हणुन काम करताना प्रत्यक्षात विकास हे खरे नाणे बनावट होत चालले आहे. दोन्ही पक्षांना हिंदु व मुस्लीम धर्मात दरी असणे सोयीस्कर व हितावह वाटते. त्यामुळे एकसंध भारताला तुकड्यात पाडणारे हे पक्ष किती रसातळाला नेणार आहेत याची कल्पनाच केलेली बरी ! सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता याविषयी आमचे स्पष्ट मत आहे की जगामध्ये एकच धर्म सर्वश्रेष्ठ किंवा सर्वात श्रेष्ठ अशा कोणत्याही विचाराशी समतुल्य असा धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म आहे .
जेव्हा रूग्णाला रक्ताची गरज असते तेव्हा कोणी रक्तदाता कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
मेकॉलची शिक्षणपध्दती किती दिवस व्यवस्थेने पचवायची ?
आठवीच्या वर्गावर भूमितीचा तास चालू होता. प्रमेय समजावून सांगणारे शिक्षक असे मानू या समजू असे सांगून प्रमेयाची सिध्दता समजावून सांगत होते....
-
(राजकीय पक्षांना आरटीआय ) संपत्तीच्याआकडेवारीत शुन्य सांगणे बंधनकारक नको-चिंदबरम नवी दिल्ली-राजकीय पक्षांना आरटीआयमध्ये संपत्तीची...